आज पुण्यात १७ ऑगस्ट २०२५ रविवार
आज पुण्यात १७ ऑगस्ट २०२५ रविवार
.......................................
सकाळी ः
संवादिनीवादन ः स्वरानुजा म्युझिक अकादमी आयोजित ः शिष्यांचे संवादिनीवादन व तन्मय देवचके यांचे एकल संवादिनीवादन ः गोपाळ देवचके शिष्यवृत्ती प्रदान कार्यक्रम ः न्यू इंग्लिश स्कूल, गणेश सभागृह, टिळक रस्ता ः १०.००.
पुस्तक प्रकाशन ः नचिकेत मेहेंदळे लिखित ‘चक्रधार’ पुस्तकाचे प्रकाशन ः पुस्तकातील समाविष्ट चक्रधारांचे वादन ः सादरकर्ते- ओंकार जोशी, सिद्धार्थ कुंभोजकर ः भावे हायस्कूल, प्र. ल. गावडे सभागृह, पेरुगेट पोलिस चौकी व हत्ती गणपती जवळ ः १०.००.
पुस्तक प्रकाशन ः चपराक प्रकाशन आयोजित ः विविध लेखकांच्या सहा पुस्तकांचे प्रकाशन ः अध्यक्ष- अरुण नलावडे ः प्रमुख पाहुणे- अभिराम भडकमकर, राम कुतवळ ः श्रमिक पत्रकार भवन, नवी पेठ, गांजवे चौक ः १०.००.
पदग्रहण सोहळा ः राजस्थान फाउंडेशनच्या पुणे विभागाचा पदग्रहण सोहळा ः प्रमुख पाहुणे- मुरलीधर मोहोळ, पी. पी. चौधरी ः नानुश्री मंगल कार्यालय, गंगाधामजवळ, मार्केट यार्ड ः १०.००.
व्याख्यान ः ज्ञान प्रबोधिनी आयोजित ः कै. अप्पा पेंडसे यांच्या जन्मदिनानिमित्त ः रूप पालटू व्याख्यानमाला ः विषय- नव्या आंतरराष्ट्रीय व्यवस्थेसाठी भारताची संरक्षण सिद्धता ः वक्ते- मनोज नरवणे ः ज्ञान प्रबोधिनी, सदाशिव पेठ ः १०.३०.
पुस्तक प्रकाशन ः मिहाना पब्लिकेशन प्रकाशित ः अभय इनामदार लिखित ‘भूछत्र’ पुस्तकाचे प्रकाशन ः हस्ते- सुबोध भावे, डॉ. वंदना बोकील ः भावे प्राथमिक शाळा सभागृह, टिळक रस्ता, सदाशिव पेठ ः १०.००.
दुपारी ः
गुरुपूजन व गुरुवंदना ः पं. राजेंद्र कंदलगांवकर यांचे गुरुपूजन व शिष्यांकडून गुरुवंदना ः सवाई गंधर्व स्मारक, राहुल थिएटर जवळ, शिवाजीनगर ः ३.००.
सायंकाळी ः
अभिव्यक्ती आयोजित ः जरा याद करो कुर्बानी- स्वातंत्र्यलढ्यातील अज्ञातांच्या कथा आणि फिल्म्स क्लिपिंग ः लोकायत हॉल (तळमजला), निर्मिती शोरूमजवळ, लॉ कॉलेज रोड, नळस्टॉप ः ५.००.
व्याख्यान व पुस्तक प्रकाशन ः प्रा. अनिरुद्ध देशपांडे यांच्या पंचाहत्तरीनिमित्त व्याख्यान ः विषय- ‘आपल्या सांस्कृतिक संचितासमोरील आव्हाने’ ः वक्ते- विनय सहस्रबुद्धे ः प्रा. अनिरुद्ध देशपांडे यांच्या भाषणांचे संकलन असलेले ‘आवर्तन’ या पुस्तकाचे प्रकाशन ः टाटा हॉल, बीएमसीसी महाविद्यालय ः ६.००.
व्याख्यान ः महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आयोजित ः डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या बाराव्या स्मृतिदिनानिमित्त व्याख्यान ः विषय- ‘भारताचे संविधान आणि वैज्ञानिक दृष्टिकोन’ ः वक्ते- अभय ओक ः अध्यक्ष- हेमंत गोखले ः साने गुरुजी स्मारक, सिंहगड रस्ता, दांडेकर पुलाजवळ ः ६.००.
पुरस्कार वितरण ः पूना गेस्ट हाउस स्नेहमंच, कोहिनूर कट्टा आणि विदिशा विचारमंच आयोजित ः कोहिनूर रत्न पुरस्कार ः पुरस्कारार्थी- आशा पारेख ः हस्ते- कृष्णकुमार गोयल ः अण्णा भाऊ साठे सभागृह, सातारा रस्ता ः ६.००.
................