पुणे
पिस्तूल बाळगल्याप्रकरणी दोन तरूणांना अटक
पुणे, ता. १६ ः बेकायदा देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या दोन तरुणांना गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने कात्रजमधील आंबेगाव परिसरातून अटक केली. त्यांच्याकडून एक पिस्तूल आणि काडतूस जप्त केले.
शुभम राजेंद्र बेलदरे (वय २९, रा. दत्तनगर, जांभूळवाडी रस्ता, आंबेगाव), मयूर ज्ञानोबा मोहोळ (वय २३, रा. नऱ्हे रस्ता, धायरी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. खंडणीविरोधी पथकातील पोलिस कर्मचारी मयूर भोकरे आणि रहीम शेख हे कात्रज भागात गस्त घालत होते. त्या वेळी दोघे जण थांबले असून, त्यांच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल असल्याची माहिती भोकरे आणि शेख यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून दोघांना पकडले. त्यांच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि काडतूस जप्त करण्यात आले.