तरुणाच्या अवयवदानामुळे चौघांना जीवदान

तरुणाच्या अवयवदानामुळे चौघांना जीवदान
Published on

पुणे, ता. ४ : धाराशिव येथील ३३ वर्षीय रिक्षाचालकामुळे चौघांना जीवदान मिळाले आहे. मेंदूतील रक्तस्रावामुळे सोलापूरमधील रुग्णालयात उपचार सुरू असताना रिक्षाचालकाचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी ‘ब्रेड डेड’ झाल्याचे घोषित केले. नातेवाइकांनी पुढाकार घेऊन अवयव दान करण्याचा निर्णय घेतला.

पुण्यात सर्व अवयव ‘ग्रीन कॉरिडॉर’ने आणण्यात आले. ३१ मार्चला सोलापूरातील चंदन न्यूरो सायन्स येथे मेंदूतील रक्तस्रावामुळे ‘ब्रेन डेड’ घोषित केल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांचे समुपदेशन करण्यात आले. पत्नी आणि आईने अवयवदानासाठी संमती दिली. रुग्णाची दोन्ही मूत्रपिंडे, यकृत आणि फुफ्फुस या अवयवांचे प्रादेशिक अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार वाटप करण्यात आले. समितीचे या वर्षातील हे पंचविसावे अवयवदान असल्याची माहिती समन्वयक आरती गोखले यांनी दिली.

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात २१ वर्षीय महिलेमध्ये यकृताचे, २२ वर्षीय पुरुषामध्ये मूत्रपिंड प्रत्यारोपित करण्यात आले. सोलापूर येथील अश्विनी ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयातील ४३ वर्षीय पुरुषाला मूत्रपिंड आणि डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील ६६ वर्षीय पुरुषामध्ये फुफ्फुस प्रत्यारोपित करण्यात आले. सर्व प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या असून रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.

‘झेडटीसीसी’ अंतर्गत २००४ पासून झालेले अवयवदान
मूत्रपिंड प्रत्यारोपण : ७८७
यकृत : ५०३
हृदय : ५४
फुफ्फुसे : ३०
मूत्रपिंड, स्वादुपिंड : ३४
हृदय, फुफ्फुस : ४
मूत्रपिंड, यकृत : १०
लहान आतडे : ४

एकूण प्रत्यारोपण - १,४२६
एकूण अवयवदाते - ५८२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com