

पुणे, ता. १ : घरातून ऑनलाइन पद्धतीने काम करत चांगले पैसे कमवता येतील, असे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी खराडी भागातील एका महिलेची १२ लाख ६३ हजार रुपयांची फसवणूक केली. याबाबत एका महिलेने खराडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, सायबर चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर चोरट्यांनी तक्रारदार महिलेच्या मोबाईल क्रमांकावर संदेश पाठविला होता. ऑनलाइन पद्धतीने काम केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष चोरट्यांनी महिलेला दाखविले होते. सुरुवातीला चोरट्यांनी महिलेला परताव्यापोटी काही रक्कम दिली. त्यामुळे महिलेच्या विश्वास बसला. महिलेला चोरट्यांनी आणखी रक्कम गुंतविण्यास सांगितले. महिलेने चोरट्यांच्या खात्यात वेळोवेळी १२ लाख ६३ हजार रुपये जमा केले. पैसे जमा केल्यानंतर चोरट्यांनी त्यांचे मोबाईल क्रमांक बंद केले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय चव्हाण तपास करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.