बावधन-कोथरूड प्रभागात बाराशे मतदारांची दुबार नावे ‘मनसे’चा दावा ः मतदार यादीची पडताळणी
पुणे, ता. १६ ः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही दिवसांवर आल्या आहेत. पक्षाच्या वतीने पुण्यातील बावधन-कोथरूड प्रभागातील मतदारयाद्यांची पडताळणी केली, त्यामध्ये अंदाजे दोन हजार मतदारांची नावे ही दुबार आहेत, असा दावा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस बाळा शेडगे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला. त्याचबरोबर बावधन-कोथरूड या प्रभागामध्ये एक हजार १५८ मतदारांची नावे हे दोन ते तीन वेळा आहेत, याचे पुरावे आहेत, असेही शेडगे यांनी सांगितले.
पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेप्रसंगी मनसेचे कामगार सेना उपाध्यक्ष नरेंद्र तांबोळी, कोथरूड विभाग सचिव राजेंद्र वेडेपाटील, शहर संघटक प्रशांत मते, शहर सचिव संजय भोसले, उपविभाग अध्यक्ष महेश लाड, शहर सचिव रमेश जाधव उपस्थित होते. दुबार नावे रद्द करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
शेडगे म्हणाले, ‘‘एका सॉफ्टवेअरच्या माध्यमातून सारखी दिसणारी नावे आम्ही वेगळी केली. नावे सारखी असू शकतात. पण छायाचित्रेही सारखीच आढळली. त्यामध्ये पुण्यातील एका सनदी अधिकाऱ्याचे नावही दुबार आहे. नावात थोडे वेगळ्या पद्धतीने लिहून खडकवासला, भोर आणि कोथरूड या तीन विधानसभा मतदारसंघात ही नावे आढळून आली आहेत. मतदार तेच आहेत, फक्त त्यांचे पत्ते बदलले आहेत.’’
ज्या वेळी प्रत्यक्षात मतदान होते, अनेकांच्या तक्रारी मतदान केंद्रावर नोंदविल्या जातात. मात्र, दुसऱ्या निवडणुकीतही पुन्हा त्याच व्यक्तीची ती समस्या कायम असते, त्यामुळे या तक्रारींचे काय होते? असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.