‘ऍग्री बिझनेस मॅनेजमेंट’ला नोव्हेंबरमध्ये सुरुवात

‘ऍग्री बिझनेस मॅनेजमेंट’ला नोव्हेंबरमध्ये सुरुवात

Published on

पुणे, ता. १६ : कृषी क्षेत्राशी संलग्न खते, बि-बियाणे, कीडनाशके, इरिगेशन, टिश्‍युकल्चर, यंत्रे-अवजारे, अन्नप्रक्रिया, पुरवठा साखळी व्यवस्थापन, माहिती तंत्रज्ञान आदींच्या सहकार्याने तयार केलेल्या एक वर्षाच्या ऍग्री बिझनेस मॅनेजमेंट या अभ्यासक्रमाला नोव्हेंबरमध्ये सुरुवात होत आहे. दरवर्षी राज्यभरातील ग्रॅज्युएट विद्यार्थी या अभ्यासक्रमात सहभागी होतात. या वर्षीची प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यात सुरू आहे.
ज्या विद्यार्थ्यांची पदवी पूर्ण झाली आहे आणि ते स्टार्टअप करण्याच्या वा बिझनेस सुरू करण्याचा विचार करत आहेत किंवा चांगली नोकरी मिळण्यासाठी स्वतःमध्ये बदल घडवू इच्छित आहेत अशांसाठी हा अभ्यासक्रम फायदेशीर आहे. कारण अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये कॅम्पस प्लेसमेंटद्वारे नोकरीच्या संधी मिळतातच शिवाय ते आत्मविश्वासाने स्वतःचा व्यवसायही करू शकतात.
अभ्यासक्रमात सध्या ज्या क्षेत्रात बिझनेस करायला संधी आहेत जसे की इम्पोर्ट-एक्स्पोर्ट, सप्लाय चेन मॅनेजमेंट, कृत्रिम बुद्धिमत्ता, अन्नप्रक्रिया, ड्रोन तंत्रज्ञान, रोबोटीक्स तसेच जिथे नोकरीच्या भरपूर संधी आहेत, असे क्षेत्र जसे ऑपरेशन्स, फायनान्स, हायड्रोपोनिक्स, इ-कॉमर्स, डिजिटल मार्केटिंग आदींशी निगडित विषयांचा समावेश आहे. आपण अजूनही कुठल्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याच्या विवंचनेत असाल तर हा अभ्यासक्रम आपल्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो.

६० हजारांपर्यंत शिष्यवृत्तीची संधी
१० वर्षांपासून सुरू असणाऱ्या या अभ्यासक्रमाची दखल घेऊन देशातील नामांकित खत उद्योग दीपक फर्टिलायझर्स ऍण्ड पेट्रोकेमिकल्स कार्पोरेशन लिमिटेड यांनी ईशान्य फाउंडेशन तर्फे होतकरू विद्यार्थ्यांना शुल्कात सवलत म्हणून ६० हजारांपर्यंत शिष्यवृत्तीची संधी उपलब्ध करून दिली आहे.

प्रवेश प्रक्रिया किंवा अभ्यासक्रमाबाबत अधिक माहितीसाठी संपर्क ः ९८८१०९९७५७ वा ८४८४८२२१६६ किंवा सोबत दिलेला क्युआर कोड स्कॅन करावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com