खाण्यायोग्य फुले-पानांचा व्यवसाय

खाण्यायोग्य फुले-पानांचा व्यवसाय

Published on

खाण्यायोग्य पाना-फुलांच्या उत्पादन व व्यवसायाबाबत माहिती देणारी तीन तासांची ऑनलाइन कार्यशाळा २४ व २५ ऑक्टोबर रोजी आयोजिली आहे. यामध्ये खाण्यायोग्य फुलांची व पानांची ओळख, वर्गीकरण व सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वे, खाण्यायोग्य आणि अखाद्य फुलांमधील फरक, लागवडीचे तंत्र, माती तयार करणे, लागवड पद्धती, खाद्य फुलांचे संगोपन, पाणी व खत व्यवस्थापन, कीड नियंत्रण, कापणी पद्धती, खाद्य फुलांचे फायदे, हॉटेल व विविध केटरिंग व्यवसायात असणारी मागणी व विक्री प्रक्रिया, खाद्य पाना-फुलांवर प्रक्रिया करून त्यांना अधिक दिवस कसे टिकवावे, खाण्यायोग्य फुलांचे आरोग्य फायदे व पौष्टिक मूल्ये, विविध पाककृती, खाद्यपदार्थांच्या सजावटीमध्ये उपयोग आदींबाबत नामवंत तज्ज्ञ व सल्लागार सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत.

मेडिकल कोडिंग प्रमाणपत्र प्रशिक्षण
वैद्यकीय क्षेत्रात करिअरसाठी मेडिकल कोडिंग हा तीन महिन्यांचे प्रमाणपत्र प्रशिक्षण ‘एसआयआयएलसी’ व टेक महिंद्रा यांच्या वतीने २५ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. यामध्ये ‘सीपीसी’ (सर्टिफाइड प्रोफेशनल कोडर) प्रमाणपत्र तयारीचे मार्गदर्शन तसेच ‘केपीओ’ (नॉलेज प्रोसेस आउटसोर्सिंग) व ‘बीपीओ’साठीचे (बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग) मार्गदर्शन होणार आहे. मेडिकल शब्दावलीची ओळख, मेडिकल सेवा भाषेची समज, शरीर विज्ञान आणि शारीरिक रचना, कोडिंग प्रणाली : आयसीडी-१०, सीपीटी आणि एचसीपीसीएस कोडिंग, वैद्यकीय सेवा नियमावली (एचआयपीएए), कोडिंग नियम व मार्गदर्शक तत्त्वे, कोडिंग सराव आदींचा समावेश आहे. सायन्स विषयातील २१ ते २५ वयोगटातील पदवीधारक, व्यावसायिक, मेडिकल कोडिंगमध्ये करिअर करू इच्छिणारे प्रवेशास पात्र आहेत.

वास्तुशास्त्र नियोजनाविषयी कार्यशाळा
वास्तुशास्त्रानुसार घर, ऑफिस वा दुकान कसे असावे याबाबत माहिती करून देणारी ऑनलाइन कार्यशाळा २७ ऑक्टोबरपासून आयोजिली आहे. घर वास्तुदोषमुक्त असावे ही इच्छा बाळगणाऱ्या सर्वांसाठी ही कार्यशाळा उपयुक्त आहे. कार्यशाळेत वास्तुशास्त्र काय आहे, वास्तुदोष कोणते आहेत, त्याचे परिणाम कोणाला जाणवतात, दिशा, उपदिशा, अधिपती देवता आणि पंचतत्व, दिशा आणि प्रभाव, वास्तुपुरुष मंडल, मर्मस्थान, उपमर्मस्थान, जमीन कशी निवडावी, घर नक्की कोठे व कसे बांधले पाहिजे, घर बांधण्यास प्रारंभ कसा करावा, घरातील अंतर्गत रचना कशी असावी, मुख्य दरवाजाची दिशा ओळखणे, दरवाजा कोठे करावा, वास्तुचे आयुष्य आदींबाबत मार्गदर्शन होणार आहे.

‘एसआयआयएलसी’च्या विविध प्रशिक्षण व कार्यशाळांची माहिती मिळवण्यासाठी व नावनोंदणीसाठी संपर्क : ८४८४८११५४४, ९३५६९७३४२७, ८९५६३४४४७२


‘महारेरा’ परीक्षेसाठी अर्ज करण्याची शेवटची संधी
‘महारेरा’ सक्षमता प्रमाणपत्र सर्व स्थावर संपदा अभिकर्ते आणि बांधकाम क्षेत्रातील विकसकांकडे स्थावर संपदा व्यवहार करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अनिवार्य झाले आहे. यासाठी ‘महारेरा’ मान्यताप्राप्त संस्थेमार्फत होणारे २० तासांचे प्रशिक्षण पूर्ण करणे व परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. या परीक्षेसाठी अर्ज करण्याचे पोर्टल १२ सप्टेंबर रोजी चालू झाले आहे. १० नोव्हेंबर रोजी हे पोर्टल बंद होणार असल्याने त्यापूर्वी एजंटचे प्रशिक्षण पूर्ण झालेले असणे आवश्यक आहे. पोर्टल बंद होण्यापूर्वीचे पुढील प्रशिक्षण २७ ऑक्टोबर रोजी सुरू होणार आहेत. २०२५ या वर्षात नंतर पोर्टल चालू होण्याची शक्यता नसल्याने प्रशिक्षण पूर्ण करून डिसेंबर २०२५मध्ये होणाऱ्या परीक्षेस सामोरे जाण्याची ही या वर्षातील शेवटची संधी आहे.
संपर्क : ८४८४८२२८५५, ८९५६३४४४७५, ७३५०००१६०२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com