इलेक्ट्रॉनिक बाजारात लखलखाट
पुणे, ता. १६ : दिवाळीमुळे लायटिंगच्या माळा, आकाशकंदिलांनी तसेच विविध लाइटच्या झुंबरांनी लक्ष्मी रोड, तुळशीबाग, बुधवार पेठ, रविवार पेठ येथील इलेक्ट्रॉनिक बाजारपेठा सायंकाळ होताच झगमगू लागल्या आहेत. दुकानांच्या बाहेर लटकलेल्या रंगीत माळा, स्मार्ट स्ट्रीप्स आणि इतर विविध दिव्यांनी शहर उजळून निघाले आहे.
अनेक सोसायट्यांमध्ये ‘गोल्ड ॲण्ड वॉर्म व्हाइट’ किंवा ‘कलर ब्लास्ट’ थीमने डेकोरेशन होत आहे. विक्रेत्यांचे म्हणणे आहे की, लोक आता फक्त स्वस्त माळांवर न थांबता टिकाऊ, सुरक्षित आणि ऊर्जा बचत करणारे पर्याय शोधत आहेत.
यंदा बाजारात स्मार्ट आणि सोलर लायटिंग सर्वाधिक लोकप्रिय आहे. वायफाय आणि ब्लूटूथने चालणाऱ्या स्मार्ट स्ट्रीप्स अलेक्स आणि गुगल होम्सशी जोडता येतात. ग्राहक मोबाईलवरून रंग बदल, टायमर सेटिंग आणि इफेक्ट्स नियंत्रित करू शकतात. तसेच सोलर ऑपरेटेड स्ट्रिंग लाइट्सही मोठ्या प्रमाणावर विकल्या जात आहेत. ज्येष्ठ नागरिक अजूनही मातीचे दिवे आणि तेलाचे कंदील घेतात, तर तरुण पिढी स्मार्ट, वॉर्म-व्हाइट आणि थीम-बेस्ड लाइट्सला प्राधान्य देते. मोठ्या सोसायट्यांमध्ये एकसमान रंगसंगती ठेवून संपूर्ण इमारत उजळवण्याची पद्धत सुरू झाली आहे.
विविध प्रकार उपलब्ध
- कॅंडल लाइट्स - खऱ्या मेणबत्तीसार,ख्या पण ज्वालाविरहित एलईडी कॅंडल्स सुरक्षित आणि पुनर्वापरयोग्य आहेत. ‘फ्लिकर इफेक्ट’ हेदेखील या लाइटमध्ये उपलब्ध आहेत.
- फ्लॉवर लाइट्स - गुलाब, कमळ, सूर्यफूल अशा डिझाइन्समध्ये मिळणाऱ्या या माळांमध्ये काही सुगंधी कोटिंगसह येतात. गोल्डन रोज आणि लोटस थीम लाइट्स लोकप्रिय आहेत.
- बॉल लाइट्स - कॉटन किंवा पेपर बॉल्समध्ये बसविलेले एलईडी दिवे घराला मॉडर्न टच देतात.
- लँटर्न लाइट्स - काच किंवा धातूपासून बनविलेले विंटेज आणि मोरोक्कन लायटिंगचे नवीन प्रकारदेखील उपलब्ध.
- थीम-बेस्ड लाइट्स - स्टार-मून, हार्ट, बटरफ्लाय, तसेच गणपती किंवा स्वस्तिकाच्या आकारातील लाइट्स सजावटीला नवा लुक देतात.
- संगीताच्या तालावर रंग बदलणाऱ्या म्युझिक-सिंक लाइट्सना विशेष मागणी आहे.
मल्टिकलर माळांची झळाळी
आरजीबी (लाल, हिरवा आणि निळा रंग) आणि आरजीबीआयसी तंत्रज्ञानावर आधारित रंगीबेरंगी माळा एकाच वेळी अनेक रंग दाखवतात. लाल, हिरवा, निळा, गुलाबी अशा तेजस्वी रंगांनी घराचा प्रत्येक कोपरा उजळतो. या लायटिंगच्या माळा २०० रुपयांपासून २००० पर्यंत आहेत
दिवाळीनिमित्त आम्ही यंदा कमळ आणि गुलाब या आकाराच्या लाइट्स घेतल्या आहेत. त्या दिसायला अत्यंत आकर्षक असून, त्यांच्या रंगसंगतीदेखील खूप सुंदर आहेत. बाजारपेठेत त्या सध्या ट्रेडिंग दिसत असून, बऱ्याच नागरिकांनी आमच्या सोबत फ्लॉवर लाईइट्स आणि कॅण्डल लाइट्स विकत घेतल्या आहेत.
- सीमा थोरात, नागरिक
बाजारपेठेत यंदा सध्या लायटिंगच्या माळांसह स्मार्ट लाइटिंग घेण्याचे प्रमाण वाढले आहे. ब्लूटूथला जोड असलेल्या लायटिंगच्या माळा ट्रेनिंग आहे. दरवर्षीप्रमाणे यंदादेखील नागरिकांचा उत्साह तितकाच आहे. दिवाळीनिमित्त विविध पॉवर सेविंग लाइटिंगच्या माळादेखील आहेत.
- कृष्णा राजपुरोहित, विक्रते
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.