पद्मावती विभागातर्फे ‘वृत्तपत्र विक्रेता दिन’ उत्साहात
पुणे, ता. १९ : पुणे वृत्तपत्र विक्रेता संघांच्या पद्मावती विभागाच्या वतीने पद्मावती विभागातील वृत्तपत्र विक्री केंद्रावर उत्साहपूर्ण वातावरणात ‘जागतिक वृत्तपत्र विक्रेता दिन’ साजरा करण्यात आला.
वर्षानुवर्षे वाचकांच्या घरी ज्ञानगंगा पोहोचविण्याची जबाबदारी निष्ठेने पार पाडणाऱ्या ज्येष्ठ विक्रेत्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. यामध्ये किशोर भरेकर, अशोक चोरगे, उल्हास मांजरेकर, सुनील तामकर, युवराज खोपडे, रमेश पवार, उमेश कवी, वसंत जाधव, बजरंग बोरकर, विनायक माने, प्रकाश मुजुमले, पंडित टेके, जयवंत बाबर आणि सुजाता कुडले यांचा समावेश होता. यावेळी त्यांना शाल आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी डॉ. दत्ता कोहिनकर, संकल्प फाउंडेशनचे अध्यक्ष गणेश गांधी आणि पद्मावती विभागाचे विक्रेते नेते नीलेश वलसा यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सर्व प्रमुख दैनिकांच्या वितरण विभागातील अधिकारी देखील यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमानंतर मिठाई वाटप आणि फटाक्यांच्या आतषबाजीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला.