दिवाळी अंक- किशोर
१) किशोर
बदलत्या काळाबरोबर ‘किशोर’चे स्वरूप सतत बदलत राहिले आहे; परंतु रंजकता, ज्ञान आणि संस्कार यावर ‘किशोर’ने दिलेला भर आजही कायम आहे. बालभारतीच्यावतीने प्रकाशित होणाऱ्या या दिवाळी अंकात वैविध्यपूर्ण साहित्य देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. रंजकतेबरोबरच उत्तम संस्कार, देशप्रेमाची हाक, थोरामोठ्यांबद्दल आदरभाव, विज्ञानाविषयी ओढ, शेती व पशू-पक्ष्यांची माहिती, पर्यावरण अशा अनेक गोष्टींचा या अंकात अंतर्भाव करण्यात आला आहे. या अंकात दिलीप प्रभावळकर, अच्युत गोडबोले, दासू वैद्य, अरुण शेवते, अवधूत डोंगरे, डॉ. प्रतिमा जगताप, कल्पना दुधाळ, प्रवीण दवणे, मुकेश माचकर, मृणालिनी वनारसे, अंबरिश मिश्र, प्रा. सुहास बारटक्के, संगीता बर्वे, नामदेव कोळी, किरण येले, डॉ. पंडित विद्यासागर, राजीव तांबे, संजय भास्कर जोशी, रेणू पाचपोर, प्रशांत असनारे आदींच्या कथा व कवितांचा समावेश आहे. तसेच गंमतकोडी, चित्रकोडेही अंकात देण्यात आली आहेत. त्याचबरोबर बालमित्रांसाठी घनश्याम देशमुख यांनी तयार केलेली चित्रकथा देण्यात आली आहे.
संपादक ः अनुराधा ओक
पाने ः १३२ मूल्य ः ७५
------------------------
२) मानिनी
मुलाखत, परिचयात्मक लेख, विनोदी लेख, माहितीपर लेख, ललित लेख, प्रवास वर्णन, विविध विषयांवरील कथा, पुस्तक परिचय आणि रुचिरंग आदी भरगच्च मजकूर अंकात आहे. यशोदा वाकणकर यांनी लिहिलेल्या तिबेटच्या सफरीतील दलाई लामा यांच्या अविस्मरणीय भेटीचा विलक्षण अनुभव आहे. डॉ. चंद्रशेखर कर्वे यांच्या ‘जिम कॉर्बेट ः थोडा जनातला थोडा मनातला’ या प्रसिद्ध शिकाऱ्याच्या अंतरंगाचा घेतलेला हृदयस्पर्शी वेध आहे. ‘इंदिरा ग्रुप’च्या सर्वेसर्वा तरिता शंकर यांच्या यशस्वी कारकीर्दीचा परिचय आहे. ‘एका कथेची कथा’ ही उदय जोशी यांची कथा आहे. त्याचबरोबर उज्ज्वला केळकर, जुई कुलकर्णी, पूनम छत्रे, अपर्णा देशपांडे, विनायक ढवळे आदींच्या कथा आहेत. यासोबत कविवर्य वैभव जोशी यांच्या काव्यप्रतिभेचे मनोज्ञ विवेचन आहे. मंगला गोडबोले यांचा विनोदी लेख आहे. डॉ. चंद्रशेखर कर्वे, संगीता जोशी, उषा देशपांडे, प्रवीण दवणे, डॉ. नीती बडवे आदींचे परिचयात्मक लेख आहेत.
संपादक ः केदार कानिटकर
पाने ः २२०
किंमत ः ३५० रुपये
--------------------
३) परिवर्तनाचा वाटसरू
‘कविता भान’ हे या अंकाचे वैशिष्ट्ये आहे. मराठीतील समकालीन कवितांविषयी समकालीन कवी आणि कवयित्रींकडून लिहून घेण्याची किमया या अंकात साधली आहे. मला भावलेली ‘पुरुषलिखित कविता’ या विभागात मलिका अमर शेख, आसावरी काकडे, नीरजा, अंजली कुलकर्णी, मीनाक्षी पाटील, सारिका उबाळे, कविता मुरूमकर आदींनी लिहिले आहे. मला भावलेली स्री लिखित कविता या विभागात गणेश विसपुते, प्रवीण बांदेकर, प्रफुल्ल शिलेदार, प्रमोद मनोहर कोपर्डे, दा. गो. काळे, श्रीकांत देशमुख, एकनाथ पाटील, किरण येले, फेलिक्स डिसोझा आदींनी लिहिले आहे. त्याचबरोबर लोकनाथ यशवंत, राजश्री देशपांडे, वृषाली विनायक, प्रशांत असणारे, गणेश कनाटे, अक्षय शिंपी, कल्पना दुधाळ, उषा हिंगोणेकर, राहुल पुंगलिया आदींनी कवितांची मैफील सजवली आहे.
संपादक ः अभय कांता
पाने ः ११४, किंमत ः १०० रुपये
४) सुहास्यजत्रा
संपूर्णपणे विनोदाला वाहिलेला अंक अशी या अंकाची ओळख आहे. विनोदी कथा, व्यंगचित्रे आदींनी अंक सजला आहे.
अरूण नासिककर यांच्या सात विनोदी कथा या अंकात आहेत. त्याचबरोबर शंकर इनामदार, प्रा. किशोर मोरे, भगवान हिरे, अरूण वगळ, शशिकांत भंडारे, गुलाब नदाफ आदींच्या कथा आहेत. वसंत गवाणकर, प्रभाकर ठोकळ, चिं. ग. मनोहर, प्रभाकर झळके, जयवंत काकडे, विवेक मेहेत्रे, अरूण मोरे, अरूण मयेकर, गजानन सावे, सुनील शेळके, वर्षा पवार आदींची व्यंगचित्रे आहेत.
संपादक ः अरूण नासिककर,
पाने ः १०४, किंमत ः २४० रुपये
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.