अवती भवती
दिवाळीनिमित्त किराणा साहित्य किटचे वाटप
पुणे, ता. २० : फर्ग्युसन कॉलेजच्या वतीने कडा येथील आनंदराव धोंडे महाविद्यालयातील पूरग्रस्त २०० विद्यार्थ्यांना दिवाळीनिमित्त किराणा साहित्य किटचे वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकीतून प्रेरित होऊन राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे उद्घाटन फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य डॉ. श्याम मुडे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी कडा येथील आनंदराव धोंडे कॉलेजचे प्राचार्य डॉ. विधाते उपस्थित होते. ‘विद्यार्थ्यांवर ओढवलेल्या संकटाच्या काळात त्यांना आधार देणे ही सामाजिक जबाबदारी आहे. कॉलेजच्या वतीने अशी मदत भविष्यातही करण्यात येईल’, असे डॉ. मुडे यांनी नमूद केले.
दिवाळी अंक वाचनाचा संकल्प
पुणे, ता. २० : सोमवार पेठेतील दि रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटीच्या ‘बालसाहित्यकार इंदिरा अत्रे वाचन कक्षात’ अत्रे प्रशालेतील विद्यार्थ्यांनी पर्यावरणास हानिकारक तसेच वायू व ध्वनी प्रदूषणास कारणीभूत ठरणारे फटाके न उडवण्याचा संकल्प केला. ‘नका उडवू फटाके, त्याचे पर्यावरणास अनेक धोके’, ‘फटाक्यांच्या आवाजाने उडते नाकीनऊ, त्यापेक्षा दिवाळी अंक वाचनाचा आनंद घेऊ’ अशा सामूहिक घोषणा देत फटाके न उडवता दिवाळी अंक वाचन करण्याचा संकल्प केला. याप्रसंगी ज्येष्ठ अस्थिशल्य विशारद व धन्वंतरी रुग्णालयाचे संचालक डॉ. मनीष कुलकर्णी, विधीज्ञ प्रवीण सूर्यवंशी, ज्येष्ठ शिक्षिका आरती जोशी यांनी उपलब्ध करून दिलेले किशोर, चिकू पिकू, लाडोबा, छावा, छात्र प्रबोधन, फुलबाग, पासवर्ड, मुलांचे मासिक, धमाल नगरी, रानवारा, बालकुमार मनःशक्ती हे २०२५चे दिवाळी अंक उपस्थित विद्यार्थ्यांना देण्यात आले. याप्रसंगी ग्रंथप्रसारक प्रसाद भडसावळे, उत्तम साळवे आदी उपस्थित होते.
भेटवस्तू, फराळाचे वाटप
पुणे, ता. २० : सहकार व कामगार क्षेत्रात काम करणाऱ्या कोथरूड येथील वनाज इंजिनिअर्स एम्प्लॉईज को ऑप. क्रेडिट सोसायटीतर्फे अनाथांची माय सिंधूताई सपकाळ (माई) यांच्या मांजरी येथील सन्मती बाल निकेतन या संस्थेत दिवाळीनिमित्त भेटवस्तू व फराळाचे वाटप करण्यात आले. या वेळी संस्थेच्या अध्यक्षा ममता सिंधूताई सपकाळ, वनाज पतसंस्थेचे अध्यक्ष श्रीकृष्ण खोडे, विजय डेरे, चंद्रसेन ढवळे, योगेश्वर चौधरी, विकास भोसले, सागर रोडे उपस्थित होते.
दिव्यांग बांधवांना साहित्य वाटप
पुणे, ता. २० : माऊली फाउंडेशन, मित्र परिवार व भारतीय दिव्यांग उद्योग समूह यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग बांधवांना दिवाळी साहित्य वाटप करण्यात आले. या वेळी फाउंडेशनचे अध्यक्ष प्रशांत तुरे, समुहाचे संस्थापक अध्यक्ष श्रीरंग शिंदे, मिलिंद चौरे, अप्पा निंबाळकर, राकेश ताकवले, तेजस साबळे, विवेक सावंत, सचिन डिंबळे, नचिकेत शेडगे आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.