ॲमेझॉनवर विका स्वतःची उत्पादने

ॲमेझॉनवर विका स्वतःची उत्पादने

Published on

पुणे, ता. २२ : ॲमेझॉनवर उत्पादन विकायचे असेल तर त्याची प्रक्रिया काय आहे, नोंदणी कशी करावी, कागदपत्रे, कालावधी हे सर्व करून बिझनेस कसा वाढवायचा, ॲमेझॉनवर विक्री करण्यास किती खर्च लागतो, सेलर पोर्टल कसे असायला हवे आदींबाबत प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करणारी ऑनलाइन कार्यशाळा २८ व २९ जूनला आयोजिली आहे. यात उत्पादन कसे लिस्ट करावे, डिलिव्हर करावे, रिटर्न्स असतील तर ते कसे हाताळावे, ॲमेझॉन ॲपवरती उत्पादन जास्तीत जास्त कसे दिसतील जेणेकरून विक्री वाढेल, सवलती कशा ठेवायच्या, उत्पादन स्पॉन्सर कसे करायचे, पेमेंट कसे पाहायचे, तत्काळ सपोर्ट कसा घ्यायचा याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
संपर्क : ९३५६९७३४२७

जमीन गुंतवणूक व पैसा कार्यशाळा
गुंतवणूक पर्याय म्हणून जमिनीकडे कसे बघावे व त्यातून पैसा कसा उभारावा याविषयी मार्गदर्शन करणारी ऑनलाइन कार्यशाळा २९ जूनला आयोजिली आहे. कार्यशाळेत जमीन शोध व निवड प्रक्रिया, जमीन प्रकार, झोन दस्तऐवजीकरण, गुंतवणुकीचे पर्याय आणि परतावा, बाजार संशोधन व स्पर्धक विश्लेषण, बँकिंग, कर आणि वित्त, निधी उभारणी, जमीन विकास, मार्केटिंग आणि प्रसार, व्यवस्थापनातून दीर्घकाळ पैसा इ.विषयांवर १०० टक्के व्यवहार ज्ञान, दाखले आणि नोट्ससहित रिअल इस्टेट प्रशिक्षक रोहित गायकवाड मार्गदर्शन करणार आहेत.
संपर्क : ८४८४८२२८५५, ९५०३६५५२७७

एफपीओ धोरण व शासकीय योजना
केंद्र सरकारने शेतकरी उत्पादक संस्था (एफपीओ) चळवळीला नवी दिशा देण्यासाठी राष्ट्रीय एफपीओ धोरणाचा मसुदा तयार केला आहे. या धोरणामुळे एफपीओंना योग्य मार्गदर्शन मिळणार आहे, ज्यामुळे त्यांचे व्यवसाय अधिक सक्षम, मजबूत आणि टिकाऊ होऊ शकतात. नव्या धोरणामुळे एफपीओंना आवश्यक साधनसुविधा, बाजारजोडणी, अन्न प्रक्रिया आणि दूध उत्पादनासाठी सरकारी मदतीचे लाभ मिळणार आहेत. याशिवाय, महिलांसाठी सक्षमीकरणाची योजना तसेच तंत्रज्ञानाच्या वापरामुळे एफपीओंना कार्यक्षम बनवण्यात मदत होईल. याबाबत मार्गदर्शन करणारे ऑनलाइन प्रशिक्षण ३० जूनला आयोजिले आहे. यात राष्ट्रीय एफपीओ धोरणाचा मसुदा, केंद्र सरकारचा २०२५-२६ चा अर्थसंकल्प, नव्या योजनांचा समावेश, वायदे बाजारातील संधी यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
संपर्क : ९१५६०१००६०, ८९५६७१२६३१

बीपीएमएस पोर्टल ऑनलाइन प्रशिक्षण
आजच्या डिजिटल युगात बांधकाम परवानग्यांची प्रक्रिया अधिक वेगवान व पारदर्शक झाली आहे. अशा वेळी बीपीएमएस पोर्टल व PREDCR प्रणाली समजून घेणे हे वास्तुविशारद, स्थापत्य अभियंते व नगर नियोजकांसाठी अत्यावश्यक झाले आहे. १ ते ३१ जुलै या कालावधीत होणारे बीपीएमएस पोर्टल ऑनलाइन प्रशिक्षण हे व्यावसायिक कौशल्य वाढवण्याची उत्तम संधी आहे. केवळ एका महिन्यात UDCPR नियोजन नियम, बिल्डिंग परमिशन प्रक्रिया, योग्य ड्रॉइंग सबमिशनसाठी स्किल्स आणि PREDCR टेस्टिंग यांसारख्या महत्त्वाच्या टप्प्यांवर प्रभुत्व मिळवणे शक्य आहे. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर तीन महिन्यांसाठी व्हाट्सॲप साहाय्य, रेकॉर्ड केलेल्या सत्रांना आजीवन प्रवेश, टीपी क्लायंट सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशन व तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळेल. बीपीएमएस आणि डिजिटल बिल्डिंग परमिशन प्रक्रियेत करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी हा कोर्स म्हणजे आजच्या काळाची गरज आहे.
संपर्क : ८४८४८११५४४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com