नाटकाची तिकिटे आरक्षित करण्यासाठी क्यूआर कोड स्कॅन करा.

नाटकाची तिकिटे आरक्षित करण्यासाठी क्यूआर कोड स्कॅन करा.

Published on

पुणे, ता. २५ : संतवाङ्मयातून प्रेरणा घेत विठ्ठल-रखुमाईच्या नात्यातील सूक्ष्म भावनांची गुंफण करणाऱ्या ‘का रुसली रखुमाई’ या नाटकाच्या प्रयोगाचे आयोजन ‘सकाळ’तर्फे करण्यात आले आहे. येत्या शुक्रवारी (ता. २४) सायंकाळी ६ वाजता कोथरूडच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात या नाटकाचा प्रयोग सादर होणार आहे.
‘का रुसली रखुमाई’ हे एक संगीतप्रधान नाटक आहे. विठ्ठल-रखुमाईच्या पौराणिक भक्तिभावातून साकारलेली ही कथा, एक वेगळाच दृष्टिकोन मांडणारी आहे. रखुमाई का नाराज आहे, या प्रश्नाचे उत्तर देताना विठ्ठल स्वतः स्त्री रूपात, तिच्या मैत्रिणीच्या रूपात येतात आणि त्यांचे भावविश्व उलगडत जाते. या प्रवासात रखुमाईच्या अंतर्मनातली खळबळ, विठ्ठलाच्या दृष्टीने भक्तिपंथाचे महत्त्व आणि अखेरीस दोघांचे अद्वैत, असा नाट्यानुभव रसिकांना मिळतो.
मुक्तायन आणि जॅकपॉट एंटरटेनमेंट निर्मित, मयूर हरदास प्रस्तुत या नाटकाचे लेखन विनोद रत्ना यांनी केले असून पियुष कुलकर्णी यांनी दिग्दर्शन केले आहे. संपदा वाघ, निहा हरदास आणि अदिती द्रविड हे नाटकाचे निर्माते आहेत. शुभंकर एकबोटे, शुभांगी जाधव, कैवल्य केजकर, कृष्णाई उळेकर आणि अदिती द्रविड यांनी या नाटकात विविध भूमिका साकारल्या आहेत. मयूर हरदास यांची प्रकाशयोजना, ऋतुजा बोठे यांचे नेपथ्य, अमृता काकतकर यांची वेशभूषा आणि अथर्व वडके, जान्हवी क्षीरसागर यांचे संगीत संयोजन आहे.
शुक्रवारी होणाऱ्या या नाटकाच्या प्रयोगाची तिकिटविक्री सुरू झाली असून ‘बुक माय शो’वर ही तिकिटे उपलब्ध आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com