आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातून 
अंधारातही भविष्य घडविणे शक्य

आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातून अंधारातही भविष्य घडविणे शक्य

Published on

पुणे, ता. २५ : ‘‘आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातून अंधारातही भविष्य घडविता येते. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केल्यास जीवनात अंधार ही अडचण न राहता शारीरिक अक्षमतांना क्षमतांमध्ये रूपांतरित करता येऊ शकते,’’ असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केले.
डॉ. दीपक शिकारपूर लिखित ‌‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स २०२५++‌’ या ब्रेल लिपीतील पुस्तकाचे प्रकाशन डॉ. माशेलकर यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी नॅशनल फेडरेशन ऑफ ब्लाइंडच्या प्रवक्त्या सकिना बेदी, फिडेल सॉफ्टच्या व्यवस्थापकीय संचालिका प्राची कुलकर्णी, जागृती स्कूल फॉर ब्लाइंडच्या व्यवस्थापक सविता गायकवाड, कौशल्य विकास मार्गदर्शक ऋजुता भागवत आदी उपस्थित होते. डॉ. शिकारपूर यांचे हे मूळ पुस्तक दिलीपराज प्रकाशनातर्फे प्रकाशित करण्यात आले असून दृष्टिहीन व्यक्तींसाठी पुस्तकाची ब्रेल आवृत्ती विकसित केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com