खासदार क्रीडा महोत्सवाचा उद्या पुण्यामध्ये समारोप
पुणे, ता. २५ : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या खासदार क्रीडा महोत्सवाचा समारोप गुरुवारी (ता. २७) होणार आहे. दोन आठवडे चाललेल्या या महोत्सवात ४० हजारांपेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या समारोपप्रसंगी अभिनेते अक्षय कुमार उपस्थित राहणार आहेत.
या क्रीडा महोत्सवामध्ये २९ मैदाने आणि क्रीडा संकुलांमध्ये ३७ खेळांच्या स्पर्धा पार पडल्या. यातील विजेत्यांचा गौरव करण्यासाठी गणेश कला क्रीडा मंच येथे गुरुवारी सायंकाळी पाच वाजता समारोप आणि पारितोषिक वितरण सोहळा होणार आहे. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव, नेमबाज अंजली भागवत, मुख्य समन्वयक मनोज एरंडे, ऑलिंपियन रेखा भिडे, माजी कबड्डीपटू शांताराम जाधव, ऑलिंपियन बॉक्सर मनोज पिंगळे, गिर्यारोहक उमेश झिरपे, माजी कबड्डीपटू शकुंतला खटावकर, टेनिसपटू नितीन कीर्तने, तसेच सुरेखा द्रविड, श्रीरंग इनामदार आदी वरिष्ठ व आजी-माजी खेळाडू उपस्थित राहणार आहेत. याशिवाय खासदार मेधा कुलकर्णी, प्रकाश जावडेकर व धीरज घाटे आदी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती मोहोळ यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

