कमला नेहरू रुग्णालयासाठी १३ कोटींचा निधी मंजूर
पुणे, ता. २५ : पुणे महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयाची रुग्णसेवा ढासळत चालली असून, उपचार वेळेवर मिळत नसल्याने तेथील रुग्णांना ससून रुग्णालयात हलवावे लागत आहे. त्यामुळे ही गंभीर स्थिती सुधारण्यासाठी आरोग्यसेवेसह कर्मचारी, डॉक्टरांची संख्या वाढविण्यासाठी पहिल्या टप्प्यात १३ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
खासगी रुग्णालयांचा खर्च परवडत नसल्याने महापालिकेच्या रुग्णालयात उपचार घेण्यासाठी गरजू नागरिक येतात. महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयाशी हे रुग्णालय जोडले गेलेले असल्याने तेथे सर्व उपचार मिळावेत अशी अपेक्षा नागरिकांची असते. पण या रुग्णालयाची आजची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) पद्धतीवर चालणाऱ्या विभागांत सुविधा ठीक असल्या तरी उर्वरित संपूर्ण रुग्णालयात प्लंबिंग, इलेक्ट्रिक, रंगरंगोटी ते उपकरणांपर्यंत सर्वच गोष्टी निकृष्ट दर्जाच्या आहेत. अनेक उपकरणे बंद पडलेली असल्याचे आयुक्त नवल किशोर राम यांच्या पाहणीत उघड झाले. या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी आरोग्य, बांधकाम व इतर विभागांची बैठक झाली. रुग्णालयाचा पूर्ण कायापालट, नवीन यंत्रसामग्री, दुरुस्ती, अंतर्गत बदल आणि रुग्णांना तातडीने आधुनिक सुविधा देण्यासाठी १३ कोटींचा आराखडा सादर करण्यात आला. पुढील सुधारणांसाठी आणखी २५ कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे.
या रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर कमतरता आहे. सध्याचे ४५ ते ६० हजारांचे वेतन अपुरे असल्याने कोणीही रुजू होण्यास तयार नाही. त्यामुळे महापालिका स्वतःचा निधी टाकून तज्ज्ञ डॉक्टरांना ८० हजार ते दोन लाख रुपये वेतन देण्याचा विचार करत आहे, असे आयुक्तांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

