निधी वाटपाचे अधिकार मुख्यमंत्र्यांना : बावनकुळे - चंद्रशेखर बावनकुळे
पुणे, ता. २५ : नगरपालिका, नगरपरिषदांच्या निवडणूक प्रचारात भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील निधी वाटपाचा वाद चव्हाट्यावर आलेला असतानाच महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी निधी वाटपाचे अधिकारी हे मुख्यमंत्र्यांना आहेत, पण आम्ही निधीचे समान वाटप करणार आहोत, असे स्पष्टीकरण दिले.
पुणे दौऱ्यावर असताना बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. उपमुख्यमंत्री अजित पवार हे अर्थमंत्री असल्याने ‘तुम्ही आम्हाला मत दिले तर निधी दिला जाईल’ असे वक्तव्य त्यांनी एका प्रचारसभेत केले. त्यावरून भाजप आणि राष्ट्रवादीत निधी वाटपावरून वाद सुरू झाला आहे. याबाबत बावनकुळे म्हणाले, ‘‘अनेक वर्षांपासून अजित पवार बारामतीमध्ये काम करत आहे. कोणताही लोकप्रतिनिधी अर्थमंत्री झाल्यावर मतदारसंघाच्या विकासासाठी अधिक लक्ष देतो, पण निधी वाटपाचे पूर्ण अधिकार मुख्यमंत्र्यांना आहेत. असे असले तरी निधीचे समान वाटप केले जाईल असे सरकार म्हणून आमचे ठरले आहे. राज्यातील इतर शहरेही चांगली असून त्या शहरांचा बारामतीकडे थोडा कल आहे. राज्यात सरकार म्हणून आम्ही एक आहोत आणि निवडणुकीनंतर सगळे नेते परत बसून चर्चा करतील.’’
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले
- नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीत महायुती दोन तृतीयांश बहुमताने निवडून येणार
- महायुतीला ५१ टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळतील
- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार महाराष्ट्राचा विकास करू शकते
- ओबीसींना २७ टक्के आरक्षण देण्याची आमची स्पष्ट भूमिका. न्यायालयाचा निर्णय शुक्रवारी, त्याकडे आमचे लक्ष
- मुंढवा जमीन खरेदी प्रकरणात संबंधित कंपनीची सुनावणी घेतली जाणार आहे. ते त्यांचे म्हणणे मांडतील. त्यानंतर काय होते ते पाहू
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

