पुणे परिमंडळात आठ दिवसांत १७७ कुष्ठरोग रुग्ण आढळले
पुणे, ता. २५ ः सध्या राज्यस्तरावर कुष्ठरोग तपासणी मोहीम सुरू आहे. त्यामध्ये, पुणे जिल्ह्यासह सातारा आणि सोलापूरमधील कुष्ठरोगाच्या रुग्णांचा शोध घेऊन त्यांचे निदान आणि उपचार केले जात आहे. ही मोहीम १७ नोव्हेंबर ते २ डिसेंबरदरम्यान राबविण्यात येत असून, पहिल्या आठ दिवसांमध्ये पुणे परिमंडळात एक कोटी १७ लाख ७४ हजार १८८ नागरिकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये आतापर्यंत कुष्ठरोगाचे ३५ हजार ५६१ संशयित रुग्ण, तर यापैकी १७७ रुग्णांमध्ये कुष्ठरोगाचे निश्चित निदान झाले आहे.
राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत पुणे परिमंडळातील तीन जिल्ह्यांमध्ये कुष्ठरोग तपासणी आणि निदान मोहीम हाती घेण्यात आली आहे. या तपासणीच्या माध्यमातून कुष्ठरोगाच्या रुग्णांपर्यंत पोचून योग्य निदान आणि वेळेत उपचार करणे, हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी विशेष आरोग्य पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकातर्फे पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांमधील घरांची तपासणी करण्यात येत आहे, अशी माहिती पुणे परिमंडळाचे आरोग्य उपसंचालक डॉ. भगवान पवार यांनी दिली.
राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत पुणे परिमंडळामध्ये कुष्ठरोग तपासणी आणि निदान मोहीम सुरू आहे. तपासणीच्या माध्यमातून कुष्ठरोगाच्या रुग्णांपर्यंत पोचून योग्य निदान आणि वेळेत उपचार करण्यात येणार असून नागरिकांनी त्याला सहकार्य करावे.
- डॉ. भगवान पवार, आरोग्य उपसंचालक, पुणे परिमंडळ
जिल्हा - तपासणी झालेली लोकसंख्या - कुष्ठरोग रुग्णांचे निदान
पुणे - ५४ लाख ५५ हजार ६०८ - ५४
सातारा - २६ लाख ६० हजार ९९० - ८२
सोलापूर - ३६ लाख ५७ हजार ५९० - ४१
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

