मुंबई दहशतवादी हल्ल्यातील हुतात्म्यांना आदरांजली

मुंबई दहशतवादी हल्ल्यातील हुतात्म्यांना आदरांजली

Published on

पुणे, ता. २६ : मुंबईत २६/११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पूर्वसंध्येला झाशीची राणी लक्ष्मीबाई चौक परिसरात पोलिस मित्र संघटनेतर्फे शहीद जवान आणि दिल्लीत झालेल्या स्फोटातील मृतांना मेणबत्ती प्रज्वलित करून आदरांजली वाहण्यात आली.
शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक महेश बाळकोटगी आणि डेक्कन पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक गिरीशा निंबाळकर आदी या वेळी उपस्थित होते. पोलिस मित्र संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कपोते यांच्या हस्ते हुतात्म्यांच्या स्मृतिस्थळाला पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. या वेळी चंद्रशेखर कपोते, पोलिस मित्र संघटनेचे कार्यकर्ते मनीष सोनीगरा, सचिन काळे, चैतन्य जगताप, उषा भालेराव, रोहिणी भोसले, विमल काळभोर, रेखा काटे आणि कुलदीप शर्मा आदींनी आदरांजली वाहिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com