‘मतदार यादीतील त्रुटींमुळे 
दहा हजार मतांवर परिणाम’

‘मतदार यादीतील त्रुटींमुळे दहा हजार मतांवर परिणाम’

Published on

पुणे, ता. २६ ः ‘‘महापालिकेच्या निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीत त्रुटी आहेत. प्रभाग क्रमांक २२ मधील यादीत दुबार नावे आहेत, तर काही जणांची नावे, पत्ता, वयदेखील एकसमान आहेत. या सर्व त्रुटींमुळे जवळपास दहा हजार मतदारांवर परिणाम होऊ शकतो. मतदार यादीतील ही अनियमितता नजरचुकीने झालेली आहे की दूषित हेतूने झाली आहे, हे तपासणे गरजेचे आहे,’’ असे प्रतिपादन माजी नगरसेवक अविनाश बागवे यांनी पत्रकार परिषदेत केले.

मतदारसंघ सोडून दुसऱ्या इतर भागातील पाच हजारपेक्षा अधिक नावे असल्याचे सांगत बागवे म्हणाले की, आमच्या प्रभागातील यादीची बारकाईने तपासणी केली असता, कासेवाडी डायस प्लॉटच्या मतदारसंघात तीन हजार ६०० दुबार मतदार असल्याचे दिसून आले आहे. माझी आजी आणि चुलते मयत होऊनदेखील त्यांची नावे वगळण्यासाठी लोकसभा, विधानसभा दोन्ही वेळा अर्ज केले तरी आत्ता पुन्हा त्यांची नावे मतदार यादीत आहेत. मोठ्या प्रमाणात स्थलांतर झालेले मतदार अद्याप यादीत दिसून येत आहेत.
----------------
मतदार यादीत नावे वगळणे, पत्ता बदलणे, नाव नोंदणी हे काम जिल्हाधिकारी कार्यालयाची आहे. महापालिकेने फक्त जिल्हाधिकारी कार्यालयाने १ जुलै २०२५ रोजीची दिलेली यादी प्रभागनिहाय फोड करण्याचे काम केले आहे. एका प्रभागातील नावे दुसऱ्या प्रभागात गेली असतील किंवा बाहेरची प्रभागात आली, तर त्यावर हरकत घेता येते. त्यात बदल करता येऊ शकतो. निवडणूक आयोगाने त्यासाठी स्वतःहून मतदार यादीत सुधारणा करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार कार्यवाही केली जाईल.
-प्रसाद काटकर, उपायुक्त, निवडणूक शाखा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com