पुण्यात दोन दिवस किमान तापमानात घट
पुणे, ता. २७ : आकाश मुख्यत: निरभ्र राहण्याची आणि उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रवाह कायम असल्याने पुणे आणि परिसरात शुक्रवार (ता. २८) आणि शनिवारी (ता. २९) किमान तापमानात किंचित घट होण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवस पुण्यातील किमान तापमान एक ते दोन अंश सेल्सिअसने कमी होण्याची चिन्हे आहेत.
कोकण-गोव्यासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुढील सहा दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. शिवाजीनगर (१४.६), पाषाण (१४.१), हवेली (१२.८), चिंचवड (१८.९), आंबेगाव (१५.८), बारामती (१५.७), तळेगाव (१५), दौंड (१४.९), लवळे (१७), शिरूर (१७.१), वडगाव शेरी (१८.९), कोरेगाव पार्क (१८.३) या परिसरात किमान तापमान १२ ते १९ अंश सेल्सिअस दरम्यान नोंदविले गेले. गेल्या आठवड्यापासून पुणे आणि परिसरातील किमान तापमानात वाढ झाली आहे. दरम्यान, पुढील दोन दिवस पुणे, पाषाण, लोहगाव, लवळे, चिंचवड, मगरपट्टा, एनडीए, कोरेगाव पार्क भागात किमान तापमानात एक ते दोन अंश सेल्सिअसने घट होईल, अशी शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

