आंदेकर टोळीने उमरटीतून १५ पिस्तुले विकत घेतली
पुणे, ता. २७ : शहरातील कुख्यात गुंड आंदेकर टोळीने मध्य प्रदेशातील उमरटी गावातून १५ पिस्तुलांची खरेदी केली असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्या पिस्तुलांचा विविध गंभीर गुन्ह्यात वापर केला आहे. त्यामुळे आंदेकर टोळीविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.
गेल्या काही वर्षांत मध्यप्रदेशातील उमरटीतून एक हजार पिस्तुलांची विक्री महाराष्ट्रात झाल्याचे धागेदोरे पुणे पोलिसांच्या हाती लागले आहेत. येथील पिस्तूल कारखान्यांवर कारवाई केल्यानंतर पुणे पोलिसांनी पुण्यासह महाराष्ट्रात पिस्तुलांची विक्री करणारी साखळी शोधण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांनी नुकतेच ‘उमरटी ऑपरेशन’ राबवून ५० ठिकाणी सुरू असलेले पिस्तूल बनवण्याचे कारखाने उद्धवस्त केले होते. या प्रकरणी सात जणांना अटक केली आहे. त्यांची रवानगी पोलिस कोठडीत केली आहे.
विमानतळ पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींकडून पिस्तुले जप्त केली होती. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत आरोपींनी मध्य प्रदेशातील उमरटी गावातून पिस्तूल खरेदी केली असल्याचे सांगितले होते. गुंड शरद मोहोळ, माजी नगरसेवक वनराज आंदेकर, आयुष कोमकर, गणेश काळे खून प्रकरणात वापरण्यात आलेली पिस्तुले उमरटी गावातील कारागिरांकडून करण्यात आली होती.
उमरटी गावातील बेकायदा पिस्तूल कारखान्यांतून गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रात आणण्यात आलेल्या पिस्तुलांचा छडा लावण्यात येणार आहे. ती पिस्तुले कोणाकोणाला दिली, त्यांचा कोठे वापर झाला, या गोष्टींच्या मुळाशी जाणार आहोत. पुणे पोलिसांनी राज्यभर पिस्तूल पुरवठा करणाऱ्यांची शोधमोहीम सुरू केली आहे. पुढील काही दिवसांत या साखळीतील आणखी नवे धागेदोरे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
- अमितेशकुमार, पोलिस आयुक्त
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

