‘फुले स्मारकाचे व्यवस्थापन
राज्य सरकारनेच पाहावे’

‘फुले स्मारकाचे व्यवस्थापन राज्य सरकारनेच पाहावे’

Published on

पुणे, ता. २८ ः महात्‍मा जो‍तिराव फुले वाडा संपूर्ण देशातील स्त्री शूद्रातीशूद्र घटकांचे प्रेरणास्थान आहे. मात्र, राज्य पुरातत्त्व विभागाच्या नियंत्रणाखाली असलेले हे स्मारक देखभालीसाठी आता छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखालील महात्‍मा फुले समता परिषदेकडे सोपविण्याचा घाट घातला जात आहे. सरकारशिवाय इतर संघटनांकडे तो सोपवू नये. या राष्ट्रीय स्मारकाचे व्यवस्थापन सरकारनेच बघावे, अशी मागणी विविध सामाजिक संघटनांनी केली आहे.

याबाबत शुक्रवारी फुले वाडा येथे पुरातत्त्व विभागाचे उपसंचालक विलास वहाणे यांना या याबाबतचे निवेदन संघटनांकडून देण्यात आले, तसेच त्याची प्रत महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनाही या वेळी देण्यात आली. या वेळी राष्ट्रीय एकात्मता समिती आणि महात्‍मा फुले समता प्रतिष्ठानचे निमंत्रक नितीन पवार, इब्राहिम खान, के. जे. जॉय, अंकुश शेडगे, प्रा. संजयकुमार कांबळे, विष्णू मोरे आदींचा समावेश होता.

गेल्या काही काळापासून महात्‍मा फुले यांचे नाव देऊन समता परिषद स्थापन आणि कार्यरत झाली आहे. त्यांनी हा वाडा देखभाल व व्यवस्थापनासाठी द्यावा, अशी मागणी केली आहे. सरकार याबाबत सकारात्मक असल्याचे चित्र उपलब्ध पत्रव्यवहार व चर्चेवरून समजत आहे. हे अत्यंत संतापजनक आहे, याविषयी येत्या ४ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता हमाल पंचायत कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, मालधक्का येथे वरील विचारांच्या संघटनांची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत याविषयीची पुढील भूमिका ठरवली जाईल, असे नितीन पवार यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com