अवती भवती
‘सी स्काऊट्स ड्रॅगन बोट’ संघाला पाच पदके
पुणे, ता. २९ : ‘सी स्काऊट्स ड्रॅगन बोट’ असोसिएशनच्या (महाराष्ट्र) संघाने मोगा (पंजाब) येथे नुकत्यात झालेल्या ‘१२ व्या सीनियर नॅशनल ड्रॅगन बोट रेस चॅम्पियनशिप’ स्पर्धेत कामगिरी करत पाच पदके पटकाविले. स्पर्धेत पुरुष गटातील १८ राज्यांच्या आणि महिला गटातील १४ राज्यांच्या संघांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. विजेत्यांचा सन्मान खासदार सरबजीत सिंह खालसा, आमदार मनजित सिंह नाहीलसिंहवाला, माजी मंत्री मालती थापर, माजी आमदार हरज्योल कमल, अध्यक्ष संदीप सिंह, ध्रुव केंन्सल यांच्या हस्ते झाला. असोसिएशनचे अध्यक्ष दीपक विश्वनाथन, उपाध्यक्ष जी.सी. बेहेरा आणि जनरल सेक्रेटरी गौरी गोपीशेट्टी यांनी संघाला शुभेच्छा दिल्या.
डॉ. अपर्णा देशमुख यांना ‘इंटरनॅशनल चेंज मेकर’ पुरस्कार
पुणे, ता. २९ : सिंहगड रस्ता येथील आभाळमाया वृद्धाश्रमाच्या डॉ. अपर्णा देशमुख यांना इंटरनॅशनल तेजस रोटरीतर्फे ‘इंटरनॅशनल चेंज मेकर’ हा पुरस्कार ‘रोटरी इंटरनॅशनल वर्ल्ड प्रेसिडेंट मिस्टर फ्रान्सिस्को अरेझो’ यांच्याकडून प्रदान करण्यात आला. या पुरस्कारासाठी पूर्ण भारतातून फक्त तीन समाजसेवकांची निवड झाली. त्यात महाराष्ट्रातून डॉ. देशमुख यांना सन्मानित करण्यात आले. या वेळी उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन, शोभना नारायण तसेच राज्यसभा सदस्य सुधांशू त्रिवेदी उपस्थित होते.
महात्मा ज्योतिबा फुले यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
पुणे, ता. २९ : महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिक्षक हितकारिणी संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रकाश पवार यांनी फुलेवाडा येथे त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

