हायड्रोपोनिक्स ऑनलाइन लेक्चर सिरीज

हायड्रोपोनिक्स ऑनलाइन लेक्चर सिरीज

Published on

पुणे, ता. २९ : वाढत्या शहरीकरणामध्ये निसर्गाची आवड जोपासायची असेल तसेच ताजा व विषमुक्त भाजीपाला स्वतः पिकवायचा असेल तर हायड्रोपोनिक्स शेती म्हणजेच मातीविरहित शेती हा एक उपयुक्त पर्याय आहे. या पार्श्वभूमीवर हायड्रोपोनिक्स, एक्वापोनिक्स, एरोपोनिक्स, घरासाठी हायड्रोपोनिक्स आणि हायड्रोपोनिक चारा इत्यादी संदर्भाने मार्गदर्शन करणारी पाच दिवसांची ऑनलाइन लेक्चर सिरीज ८ डिसेंबरपासून आयोजिली आहे. यामध्ये हायड्रोपोनिक, एक्वापोनिक आणि एरोपोनिक प्रणाली लागू करण्यासाठीची व्यावहारिक कौशल्ये व माहिती, वैयक्तिक आणि व्यावसायिक वापरासाठी घरगुती हायड्रोपोनिक्स व हायड्रोपोनिक चारा यांचे फायदे, शाश्वत शेती व पशुधन आहार उपायांमधील संधींबद्दल सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

लँडस्केप गार्डनिंग कार्यशाळा
घराच्या आजूबाजूला उपलब्ध जागेमध्ये आकर्षक लँडस्केप गार्डन तयार करण्यासाठी लागणारे ज्ञान, गार्डनचे प्रकार, डिझाईन करण्याची पद्धत तसेच झाडांची निवड, गार्डनमधील रस्ते, बॉर्डरला लावली जाणारी झाडे आदींविषयी मार्गदर्शन करणारी कार्यशाळा १३ व १४ डिसेंबरला आयोजिली आहे. कार्यशाळेत लँडस्केप गार्डनिंगचा परिचय, गार्डनमध्ये झाडांच्या वेगवेगळ्या डिझाइन तयार करण्याच्या पद्धती, साइटचे मूल्यांकन व तयारी, लँडस्केपिंग टेक्निक्स, खत व पाणी नियोजन, देखभाल पद्धती, पर्यावरणविषयक विचार, क्लायंट कम्युनिकेशन आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट, सुरक्षा आणि नियम, लँडस्केप गार्डनिंगमधील भविष्यातील ट्रेंड आदींविषयी मार्गदर्शन होणार आहे. लँडस्केपिंगमध्ये करिअरच्या संधी शोधणाऱ्यांना तसेच वैयक्तिक बागकामामध्ये स्वारस्य असणाऱ्यांना कार्यशाळा उपयुक्त आहे.

गृहनिर्माण संस्था व्यवस्थापन प्रशिक्षण
सोसायटी मॅनेजर या करिअर संधीविषयीचे तीन दिवसीय प्रमाणपत्र प्रशिक्षण एसआयआयएलसी आणि पुणे हाउसिंग फेडरेशनच्या संयुक्त विद्यमाने १९, २० व २१ डिसेंबरला आयोजिले आहे. यामध्ये सोसायटी मॅनेजरची कर्तव्ये, प्रोफाइल आणि जबाबदाऱ्या, मॅनेजिंग कमिटी अजेंडा व मिनिट्स लेखन, गृहनिर्माण संस्थेतील शेअर्स आणि व्याजाचे हस्तांतरण, देखभाल बिले तयार करणे, टीडीएस भरणे, ऑडिटसाठी चेकलिस्ट, लेखापरीक्षण अहवाल तयार करणे, सोसायटीचे वार्षिक विवरणपत्र सादर करणे आदी विषयांचा समावेश आहे. प्रशिक्षणार्थींना प्रात्यक्षिक अनुभवाची संधीही दिली जाणार आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यास गृहनिर्माण संस्थांमध्ये सोसायटी व्यवस्थापक म्हणून अर्धवेळ किंवा पूर्णवेळ करिअर संधी उपलब्ध होऊ शकते अथवा गृहनिर्माण संस्थांना विविध सेवा देऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करता येऊ शकतो.
संपर्क : ८४८४८११५४४, ९३५६९७३४२७, ८९५६३४४४७२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com