

पुणे, ता. २९ : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणुकीच्या घटना वाढल्या आहेत. सायबर चोरट्यांनी वेगवेगळ्या घटनांमध्ये चौघांची ४३ लाख १७ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याबाबत एका तरुणाने उत्तमनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सायबर चोरट्यांनी तक्रारदार तरुणाच्या मोबाईलवर मेसेज पाठविला होता. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखविले होते. तरुणाने चोरट्यांच्या खात्यात आठ लाख ५७ हजार रुपये जमा केले. त्यानंतर चोरट्यांनी तरुणाला परतावा दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली.
सायबर चोरट्यांनी शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने एका महिलेची २० लाख ५२ हजार रुपयांची फसवणूक केली. तक्रारदार महिला मगरपट्टा सिटी भागात राहायला असून, त्यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक नीलेश जगदाळे तपास करत आहेत. बोपोडी भागातील एका तक्रारदाराची सायबर चोरट्यांनी ११ लाख १२ हजार रुपयांची फसवणूक केली. याबाबत एका ५५ वर्षीय तक्रारदाराने खडकी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरण गायकवाड तपास करत आहेत. कोंढवा भागातील एकाची शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने चोरट्यांनी दोन लाख ९५ हजार रुपयांची फसवणूक केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.