एलबीटी विभाग 
बंद करण्याची मागणी

एलबीटी विभाग बंद करण्याची मागणी

Published on

पुणे, ता. २९ : स्थानिक संस्था कर (एलबीटी) विभाग बंद झालेला असतानाही महापालिकेमध्ये हा विभाग अजूनही कार्यरत आहे. तरी, महापालिका प्रशासनाने हा विभाग कायमस्वरूपी बंद करावा. तसेच त्यातील अधिकारी-कर्मचारी मिळकतकर विभागात समाविष्ट करावेत आणि महापालिका निवडणुकीसाठी एलबीटीबाबतचे प्रमाणपत्र लागते, त्यासाठी त्यांचा उपयोग करून घ्यावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महापालिकेकडे केली आहे.
मनसेचे प्रवक्ते योगेश खैरे यांनी याबाबत महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांना पत्र पाठविले आहे. केंद्र, राज्य सरकार व महापालिका प्रशासनानेही स्थानिक संस्था कर विभाग बंद करत असल्याचे जाहीर केले आहे. अन्य महापालिकांमध्ये एलबीटी विभाग बंद करून तेथील अधिकारी-कर्मचारी मिळकतकर विभागात समाविष्ट केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com