रिअल इस्टेट प्रॉपर्टी व्हॅल्युएशन प्रशिक्षण
पुणे, ता. १ : रिअल इस्टेट प्रॉपर्टी व्हॅल्युएशन करण्याच्या क्षेत्रात यायचा विचार करत असणाऱ्यांसाठी किंवा या क्षेत्रात काम करत आहे परंतु सुयोग्य पद्धत माहित नाही अशांसाठी उपयुक्त असे प्रशिक्षण तुमच्यासाठी तुमचे कौशल्य विकसित करायला मदत करणार आहे. हे प्रशिक्षण ८ ते २० डिसेंबरदरम्यान होणार आहे. हे प्रशिक्षण पूर्ण करून रिअल इस्टेट प्रॉपर्टी व्हॅल्युएशन करणाऱ्या कंपनीमध्ये नोकरी मिळू शकते. प्रशिक्षण ऑनलाइन दोन आठवडे व एक दिवस प्रात्यक्षिक अशा स्वरूपात होणार आहे. सिव्हिल इंजिनिअर्स, आर्किटेक्टस व विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण उपयुक्त आहे.
संपर्क : ८४८४८११५४४, ९३५६९७३४२७
हायड्रोपोनिक्स ऑनलाइन लेक्चर सिरीज
वाढत्या शहरीकरणामध्ये निसर्गाची आवड जोपासायची असेल तसेच ताजा व विषमुक्त भाजीपाला स्वतः पिकवायचा असेल तर हायड्रोपोनिक्स शेती म्हणजेच मातीविरहित शेती हा एक उपयुक्त पर्याय आहे. या पार्श्वभूमीवर हायड्रोपोनिक्स, एक्वापोनिक्स, एरोपोनिक्स, घरासाठी हायड्रोपोनिक्स आणि हायड्रोपोनिक चारा इत्यादी संदर्भाने मार्गदर्शन करणारी पाच दिवसांची ऑनलाइन लेक्चर सिरीज ८ डिसेंबरपासून आयोजिली आहे. यामध्ये हायड्रोपोनिक, एक्वापोनिक आणि एरोपोनिक प्रणाली लागू करण्यासाठीची व्यावहारिक कौशल्ये व माहिती, वैयक्तिक आणि व्यावसायिक वापरासाठी घरगुती हायड्रोपोनिक्स व हायड्रोपोनिक चारा यांचे फायदे, शाश्वत शेती व पशुधन आहार उपायांमधील संधीबद्दल सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
संपर्क : ८४८४८११५४४, ८९५६३४४४७२
ग्रामस्तरावरील व्यवसाय विकास प्रशिक्षण
शेतमाल व अन्न प्रक्रिया, कुटीरोद्योग, गृहोद्योग, स्थानिक नैसर्गिक संसाधनांवरील प्रक्रियाआधारित उद्योग अशा विविध प्रकारचे उद्योग व व्यवसाय करण्यासाठी गावातील होतकरू, उद्यमशील युवावर्ग, महिला, शेतकरी यांना गावामध्येच ग्रामपंचायत किंवा स्थानिक संस्थांच्या माध्यमातून व्यावसायिक प्रशिक्षणाचे आयोजन करण्यासाठी सकाळ-अॅग्रोवनची प्रशिक्षण संस्था असलेल्या सिमासेस लर्निंग (एसआयआयएलसी)द्वारे प्रशिक्षण सेवा उपलब्ध केली जाते. आपल्या गावामध्ये अशा प्रकारचे व्यवसाय विकास प्रशिक्षण आयोजित करण्याची तयारी असलेल्या ग्रामपंचायतींनी तसेच स्थानिक संस्था सिमासेस लर्निंगकडे संपर्क साधावा.
संपर्क : ८९५६७१२६३१
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

