जलसंपदाच्या जागेसंबंधातील 
‘ना हरकत’ दाखल्यांची चौकशी
कृष्णा खोरे महामंडळाच्या कार्यकारी संचालकांचे आदेश

जलसंपदाच्या जागेसंबंधातील ‘ना हरकत’ दाखल्यांची चौकशी कृष्णा खोरे महामंडळाच्या कार्यकारी संचालकांचे आदेश

Published on

पुणे, ता. २ ः खडकवासला प्रकल्पातील जागांच्या वापराबाबत दिलेल्या ‘ना हरकत’ दाखल्यांवर चौकशी होणार आहे. अतिक्रमण, संगनमत आणि बेकायदेशीर रस्त्यांच्या मान्यतांबाबत वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांनी दाखल्यांच्या चौकशीचे आदेश दिले असून, अधीक्षक अभियंत्यांना पुढील १५ दिवसांत अहवाल देण्यास सांगितले आहे.
जलसंपदा विभागाच्या शहराच्या मध्यवस्तीतील उच्च-मूल्य जागांचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारी जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यापर्यंत पोचल्या होत्या. त्यावर विखे यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या. खडकवासला धरणाचे दोन कालवे पुण्यातून पुढे गेले आहेत. ही जागा जलसंपदा विभागाची असली तरी त्यावर अनेक ठिकाणी अतिक्रमणे झाली आहेत. त्याचबरोबर या जागांमधून इतर ठिकाणी जाण्यासाठी रस्त्याचा वापरही होतो. शहरात नागरीकरण वाढत असल्याने जागांचे मूल्य अधिक झाले आहे. काही ठिकाणी नवीन प्रकल्प होत असल्याने रस्त्यांसाठी जलसंपदा विभागाच्या जागेचा वापर करून संबंधित ठिकाणी जाण्याचे मार्ग काढावे लागत आहे. अशा वेळी रस्ता तयार करताना तसेच वापर करताना जलसंपदा विभागाची मान्यता आवश्यक असते. दरम्यान, मागील महिन्यात झालेल्या बैठकीत मंत्री विखे यांनी अधिकाऱ्यांना याबाबत सूचना केल्या होत्या. त्यानंतर कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक हनुमंत गुणाले यांनी या सर्व दाखल्यांची तसेच अन्य निर्णयांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. ही चौकशी अन्य कार्यालयातील अधीक्षक अभियंता दर्जाच्या अधिकाऱ्याकडून करण्यात येत आहे. त्यासाठी पुढील पंधरा दिवसांचा अवधी देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com