झिंक धातू बॅटऱ्या अधिक काळ टिकणार
स्व-उपचारक्षम ‘हायड्रोजेल इलेक्ट्रोलाइट’ वैज्ञानिकांकडून विकसित

झिंक धातू बॅटऱ्या अधिक काळ टिकणार स्व-उपचारक्षम ‘हायड्रोजेल इलेक्ट्रोलाइट’ वैज्ञानिकांकडून विकसित

Published on

पुणे, ता. २ : पारंपारिक झिंक धातू बॅटरीमध्ये शॉट सर्किट होण्याची आणि बॅटरी निकामी होण्याची शक्यता असते. परंतु, आता झिंक धातू बॅटरीसाठी स्व-उपचारक्षम हायड्रोजेल पॉलिमर इलेक्ट्रोलाइट विकसित करण्यात संशोधकांना यश आले आहे. होय, सीएसआयआर- राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील संशोधकांनी हे महत्त्वपूर्ण संशोधन पूर्ण केले आहे. या संशोधनामुळे झिंक धातू बॅटरी टिकण्याची क्षमता वाढणार आहे.
सीएसआयआर राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील संशोधकांनी रिचार्जेबल झिंक धातू (मेटल) बॅटरीसाठी अंतर्निहित स्व-उपचारक्षम ‘हायड्रोजेल पॉलिमर इलेक्ट्रोलाइट’ विकसित केले आहे. बॅटरीची यांत्रिक हानीशी निगडित बाबींवर मात करण्यासाठी हे साहित्य सक्षम ठरणार आहे. हे संशोधन ‘अॅडव्हान्स्ड एनर्जी मटेरियल्स’ या नियतकालिकात प्रकाशित झाले आहे. संस्थेतील भौतिक आणि पदार्थ रसायनशास्त्र विभागातील प्रमुख वैज्ञानिक डॉ. श्रीकुमार कुरुंगोट आणि पीएच.डी. संशोधक प्रियांका पुथियाविट्टील यांच्या नेतृत्वाखालील संशोधन पथकाने हे संशोधन पूर्ण केले आहे.
या हायड्रोजेल पॉलिमर इलेक्ट्रोलाइटला ‘पीएचबीसी-४’ असे नाव देण्यात आले आहे. या संरचनेत एक मजबूत आणि गतिशील पॉलिमर जाळे निर्माण होते. या अभिनव संरचनात्मक रचनेमुळे डेंड्राइट निर्मिती प्रभावीपणे प्रतिबंधित करते, जे पारंपरिक झिंक धातू बॅटरीमध्ये शॉर्ट सर्किट आणि बॅटरी निकामी होण्याचे एक महत्त्वपूर्ण कारण मानली जाते.
उच्च सुरक्षा, मुबलक कच्चा माल आणि पर्यावरणीय सुसंगतता, यामुळे रिचार्जेबल झिंक धातू बॅटरीचे महत्त्व वाढत आहे. डेंड्राइट वाढ, हायड्रोजन निर्मिती अभिक्रिया आणि यांत्रिक बिघाड यांसारख्या समस्यांमुळे त्यांच्या व्यावहारिक वापरात अडथळे येतात. ‘पीएचबीसी-४’ इलेक्ट्रोलाइट गुळगुळीत आणि एकसमान झिंकला सक्षम करतो आणि यांत्रिक ताणाखाली देखील संरचनात्मक अखंडता राखतो. झिंक धातू बॅटऱ्यांमधील अडथळ्यांवर प्रभावी मात करता येते. हे संशोधन आगामी काळात अधिकाधिक टिकाऊ बॅटरी निर्मितीचे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल ठरत आहे, अशी माहिती राष्ट्रीय रासायनिक प्रयोगाशाळेने दिली आहे.

संशोधनाचे वैशिष्ट्ये
१) स्वायत्त स्व-उपचार क्षमता आहे.
२) केवळ पाच मिनिटांत हायड्रोजेल आपल्या यांत्रिक सामर्थ्याच्या सुमारे ९३ टक्के क्षमतेपर्यंत पुनर्संचयित होऊ शकते.
३) संशोधकांनी ‘पीएचबीसी-४’ इलेक्ट्रोलाइटचा वापर करून तयार केलेल्या ‘पाउच-सेल’द्वारे एलईडी दिवा प्रज्वलित होते.
४) ‘पाउच-सेल’ला कात्रीने कापल्यानंतरही त्यातील अंतर्गत जाळे आपोआप पुन्हा जोडले गेले आणि एलईडी दिवा प्रज्वलित राहिला.
५) इलेक्ट्रॉनिक उपकरणांसाठी इलेक्ट्रोलाइटची उपयुक्तता सिद्ध


फोटोः 73085, 73087

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com