टेंपोच्या धडकेने तरुणीचा मृत्यू
पुणे, ता. २ : स्वारगेट परिसरातील हिराबाग चौकात भरधाव टेंपोच्या धडकेने दुचाकीस्वार तरुणीचा मृत्यू झाला. आरिबा अर्शदअली कुरेशी (वय २४, रा. न्यू मोदीखाना, कॅम्प) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचे नाव आहे.
या प्रकरणी स्वारगेट पोलिसांनी टेंपोचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विश्वंभर दशरथ सोनवणे (वय ६२, रा. मारुतीनगर, वडगाव शेरी) असे टेंपोचालकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरिबा कुरेशी ही तरुणी २७ नोव्हेंबर रोजी दुचाकीवरून हिराबाग चौकातून निघाली होती. त्याच वेळी भरधाव वेगाने येणाऱ्या टेंपोने दुचाकीस धडक दिली. त्यामुळे ही तरुणी रस्त्यावर पडल्याने तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तिला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या अपघाताबाबत आरिबाचे वडील अर्शदअली कुरेशी (वय ५५, रा. न्यू मोदीखाना, कॅम्प) यांनी तक्रार दिली आहे.
-------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

