आंतरराष्ट्रीय फोटोग्राफी स्पर्धेत
सहभागी होण्‍याची संधी

आंतरराष्ट्रीय फोटोग्राफी स्पर्धेत सहभागी होण्‍याची संधी

Published on

पुणे, ता. ३ : शहरे आर्थिकदृष्ट्या कशी बदलत आहेत, कामगारांचे जीवन, बाजारपेठा, स्थलांतर, शहरी असमानता यांसारख्या विषयांवर आधारित छायाचित्रे आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठवण्‍याची संधी ‘आयएनएचएएफ हॅबिटॅट फोरम’ यांनी ‘सिटीज इन फोकस’ या आंतरराष्‍ट्रीय छायाचित्र स्पर्धेद्वारे उपलब्‍ध केली आहे. त्‍यामध्‍ये दक्षिण गोलार्धातील सामाजिक आर्थिकदृष्ट्या विकसित होत असलेल्या देशांमधील शहरी अर्थव्यवस्थेचे वास्तव टिपणारी प्रभावी छायाचित्रे त्‍यांनी मागवली आहेत.
शहरी उपजीविका आणि कामगार जीवन, बाजारपेठा आणि आर्थिक व्यवहार, असमानता आणि आकांक्षा, स्थलांतर, शाश्वतता या विषयांवर ही स्पर्धा जगभरातील सर्वांसाठी खुली आहे. व्यावसायिक छायाचित्रकार, विद्यार्थी, हौशी कलाकार तसेच फोटोग्राफीचे गट यामध्‍ये सहभागी होऊ शकतात. या उपक्रमातून निवडलेली सहा छायाचित्रे रूटलेज प्रकाशनाच्या आगामी पुस्तकात प्रकाशित होणार आहेत. अंतिम परीक्षक म्हणून प्रसिद्ध छायाचित्रकार रघू राय सहभागी होणार आहेत.

स्‍पर्धेचे निकष
- स्पर्धेसाठी ऑनलाइन नोंदणी आवश्यक
- जास्तीत जास्त सहा उच्च-रेझोल्युशन फोटो
- प्रत्येक फोटोसोबत शीर्षक, ठिकाण आणि लघु वर्णन
- अंतिम तारीख : ३१ जानेवारी २०२६
- फोटो पाठविण्यासाठी ई-मेल : photocompetition@inhaf.org

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com