
पुणे, ता. १७ : ‘विल्सन’ या गंभीर आजारावर मात करत जिद्दीने आपली आवड जोपासणाऱ्या अक्षय परांजपे याची गोष्ट पुस्तकरूपात वाचकांच्या भेटीला येत आहे. ‘अक्की : एक अक्षय्य इच्छाशक्ती’ हे पुस्तक सकाळ प्रकाशनातर्फे प्रकाशित केले जात असून हे पुस्तक सहा जूनला सर्वत्र उपलब्ध होईल. या पुस्तकावर २५ टक्के प्रकाशनपूर्व सवलतही देण्यात येणार आहे.
जीवन हा एक संघर्ष आहे आणि तो प्रत्येकाच्या वाट्याला वेगवेगळ्या रूपात येत असतो. पण काही लढे हे केवळ एका व्यक्तीचे नाही तर संपूर्ण कुटुंबाचे होऊन जातात. ‘अक्की’ म्हणजे अक्षय परांजपे याची गोष्टही अशीच आहे. अक्षयला झालेला ‘विल्सन’ आजार, त्या आजाराशी कुटुंबाने दिलेला लढा तसेच ‘सेलिब्रिटी फोटोग्राफर’ म्हणून अल्पावधीत त्याने मिळवलेले यश, या सगळ्यांविषयी अक्षयचे वडील संतोष परांजपे यांनी हे पुस्तक लिहिले आहे.
‘विल्सन’ या आजाराशी अक्षयने दिलेल्या लढ्याचे वर्णन, त्याचे जिगरी दोस्त, सिनेविश्वातील सेलिब्रिटी या सगळ्यांनीच अक्षयविषयी लिहिलेले त्यांचे अनुभव या पुस्तकाला रंजक करतात. परांजपे कुटुंबाला आलेल्या अडचणी, त्यातून त्यांनी काढलेले मार्ग हे सगळे वाचताना कधी डोळ्यांत पाणी येते तर, कधी त्यांना सलाम ठोकावासा वाटतो.
हल्ली अगदी लहानशा कारणाने किंवा किरकोळ आजाराने तरुण निराश होताना दिसतात. अशा काळात ‘विल्सन’सारख्या भयंकर आजाराला तोंड देणाऱ्या ‘अक्की’कडून या संकटाला निडरपणे, बिनधास्तपणे कसे सामोरे जायचे आणि सकारात्मक आयुष्य कसे जगायचे हे शिकण्यासारखे आहे. ही गोष्ट आपल्या सगळ्यांसाठीच प्रेरणादायी आहे.
- मुरलीधर मोहोळ, केंद्रीय सहकार व नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री
चित्रपट, करिअरमध्ये अडचणी येतात, त्यावेळी अक्षय आम्ही तुझी धडपड आठवतो; मग आम्हाला मार्ग सापडतो. अक्षय, तुझी ही जिद्द, धडपड अनेकांसाठी प्रेरणा ठरो.
- प्रवीण तरडे, दिग्दर्शक, पटकथालेखक आणि अभिनेते
पुस्तक : ‘अक्की : एक अक्षय्य इच्छाशक्ती’
लेखक : संतोष परांजपे
पृष्ठसंख्या : १८०
किंमत : २९९ रुपये
सवलतीतील किंमत : २२५ रुपये
संपर्क : ९८९१५९८९१५ | ८८८८८४९०५०
पुस्तकासाठी क्यूआर कोड स्कॅन करा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.