उन्हाळी सुट्ट्यांमध्ये 
जर्मन भाषा शिकवण्याची संधी

उन्हाळी सुट्ट्यांमध्ये जर्मन भाषा शिकवण्याची संधी

Published on

पुणे, ता. १८ : मुलांचा मेंदू खेळत-खेळत विकसित व्हावा, नवीन भाषा शिकण्याची गोडी लागावी यासाठी खास दोन दिवसांची ऑनलाइन कार्यशाळा २४ व २५ मे रोजी आयोजिली आहे. कार्यशाळा अगदी मजेशीर पद्धतीने, अनुभवी भाषा प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. कार्यशाळेत मुलांना जर्मन अल्फाबेट्स, संख्या, मूलभूत शुभेच्छा देणे, स्वतःची ओळख करून देणे आणि रंगांची नावे शिकवली जाणार आहेत. गोष्टी, खेळ आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून मुलांचा सहभाग वाढवून त्यांना शिकण्याचा आनंद दिला जाईल. कार्यशाळा सात वर्षे व त्यावरील वयाच्या मुलांसाठी खुली आहे. ऑनलाइन पद्धतीमुळे मुलं घरी बसूनच सुरक्षित आणि सोईस्करपणे शिकू शकतात. मुलांच्या उन्हाळ्याला शैक्षणिक आणि मजेशीर वळण देण्याची ही उपयुक्त संधी आहे.
संपर्क : ८४८४८११५४४


कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व प्रशिक्षण
एनजीओ व सामाजिक काम करणाऱ्या संस्थांना आर्थिक गरज मोठ्या प्रमाणात असते. सीएसआर निधीमधून त्यांना ही गरज भागवता येते. मात्र हा निधी कसा मिळवावा, यासाठीचे नियम व कायदे, संस्थेचा प्रकल्प अहवाल कसा सादर करावा याची बहुतेकांना माहिती नसते. या पार्श्वभूमीवरील सीएसआर प्रशिक्षण २४ व २५ मे रोजी आयोजिले आहे. यामध्ये सीएसआर नेमके काय आहे आणि काय नाही, सीएसआर कायदा, अंमलबजावणी संस्थांची भूमिका, रिपोर्टींग फ्रेमवर्क, अंमलबजावणी करण्यापूर्वी, दरम्यान आणि नंतरची प्रक्रिया, सरकारच्या अपेक्षा, भूमिका आणि जबाबदाऱ्या, सीएसआर निधीसाठी आवश्यक कागदपत्रे व प्रक्रिया आदी बाबींवर मार्गदर्शन होणार आहे. हे प्रशिक्षण समाजसेवी संस्था, फाउंडेशन्स, सीएसआर क्षेत्रात कार्यरत कंपन्यांचे अधिकारी तसेच विद्यार्थी यांना उपयुक्त आहे.
संपर्क : ८४८४८११५४४

सुरू करा पॅकेजिंग उद्योग
प्रक्रिया केलेले सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ, शेतमाल असो वा दूध किंवा पाणी अशा सर्व प्रकारच्या उत्पादनांची पॅकिंग करण्यासाठी पेपर, कोरुगेटेड बॉक्स, लाकूड, प्लास्टिक इ.विविध प्रकारचे पॅकेजिंग मटेरिअल लागत असून बाजारात याची प्रचंड मागणी आहे. हे मटेरिअल कसे तयार करतात, त्यासाठी कोणती अद्ययावत यंत्रे लागतात, छोटी पॅकेजिंग इंडस्ट्री सुरू करण्यासाठी भांडवल इ.विषयी माहिती करून देणारा ऑनलाइन प्रमाणपत्र अभ्यासक्रम २६ मेपासून सुरू होत आहे. यात पॅकेजिंग उद्योगातील वाढत्या संधी, विविध प्रकारच्या मटेरिअलची ओळख, यंत्रे, छोटे पॅकेजिंग युनिट सुरू करण्यासाठी आवश्यक बाबी इ.विषयी तज्ज्ञ मार्गदर्शन करतील. ज्यांना पॅकेजिंग इंडस्ट्रीमध्ये स्टार्टअप करायचे आहे तसेच ज्यांचे पॅकेजिंग युनिट असून त्यांना यातील नवीन तंत्रज्ञान जाणून घ्यावयाचे आहे, त्यांच्यासाठी ही कार्यशाळा फायदेशीर आहे.
संपर्क : ८४८४८११५४४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com