महापालिकेच्या इमारतीवरच आढळला नायलॉन मांजा शहरात मांजा विक्री सर्रासपणे सुरू ः महापालिकेचे विक्रेत्यांकडे दुर्लक्ष
पुणे, ता. ५ ः पतंग उडविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या नायलॉन मांजामुळे शहर व जिल्ह्यात तिघांचे बळी जाण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यानंतरही, शहरात पुन्हा एकदा नागरिक, पक्ष्यांच्या जीवितास धोका निर्माण करणारा नायलॉन मांजाची सर्रासपणे विक्री सुरू असल्याचा प्रकार उघड झाला आहे. महापालिकेच्या मुख्य इमारतीवरच शुक्रवारी पतंग व त्यासमवेत मोठ्या प्रमाणात नायलॉन मांजा आढळून आला.
पुणे, पिंपरी-चिंचवड व दौंड या ठिकाणी मागील काही वर्षात मांजामुळे गळा कापल्याने दोन तरुणींसह तिघांना आपला जीव गमवावा लागला होता. प्रारंभी पुणे पोलिसांकडून मांजा विक्रेत्यांवर कारवाई करण्यास सुरवात झाली. तर, मागील वर्षीपासून महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून मांजा विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला होता. दरम्यान, संक्रांतीनिमित्त पतंग उडविणाऱ्या लहान मुलांसह हौशी नागरिकांना शहरातील मध्यवर्ती बाजारपेठेसह उपनगरांमधील दुकानांमध्ये बंदी असलेला व धोकादायक नायलॉन मांजाची सर्रासपणे विक्री केली जात आहे. नदीपात्रामध्ये लहान मुलांकडून पतंग उडविण्याचा आनंद घेतला जातो. दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी महापालिकेच्या इमारतीवरच पतंग व नायलॉन मांजा पडला. मांजामुळे कोणाला इजा होऊ नये, यासाठी नागरिकांनी हा मांजा गोळा केला.
‘‘न्यायालयाच्या आदेशानुसार नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या मांजाची विक्री करण्यास बंदी आहे. मांजा विक्री करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई केली जाईल.’’ -अविनाश सकपाळ, प्रमुख, घनकचरा व्यवस्थापन विभाग, महापालिका
-----------------------
फोटो ः 74081
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

