‘रोटरी पीस कॉन्फरन्स’मध्ये तरुणांसाठी विविध स्पर्धा

‘रोटरी पीस कॉन्फरन्स’मध्ये तरुणांसाठी विविध स्पर्धा

Published on

पुणे, ता. ८ : रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१तर्फे ‘रोटरी पीस कॉन्फरन्स’ ही परिषद १७ जानेवारी रोजी आयोजित करण्यात येणार असून, या परिषदेत तरुणांसाठी निबंध, संशोधन, कला आणि लघुपट या चार विभागांत स्पर्धा घेण्यात येणार आहे.
तरुण लेखकांसाठी ‘पीसक्वेस्ट’ निबंध स्पर्धा, तर पंचविशीवरील ‘संशोधकांसाठी सौहार्द, सहानुभूती, शाश्वत शांतता आणि समाजनिर्मितीत युवक व कलेची भूमिका’ या विषयांवर संशोधनपत्र स्पर्धा ठेवण्यात आली आहे. कलाकारांना ‘पीस आर्ट फेस्टिव्हल’ अंतर्गत चित्रकला, इन्स्टॉलेशन्स, डिजिटल कला, छायाचित्रे सादर करता येतील. तसेच लघुपट निर्मात्यांसाठी एकोपा, करुणा, शांतता या विषयांवरील लघुपट स्पर्धा खुली आहे. निबंध, संशोधनपत्र आणि लघुपटांच्या सादरीकरणाची अंतिम तारीख १५ डिसेंबर असून, कला प्रवेशिकांची अंतिम तारीख ३० डिसेंबर आहे. पीस कॉन्फरन्समध्ये कार्यशाळा, पॅनेल चर्चा, प्रदर्शन, लघुपट प्रदर्शन आणि पीस पोल समारंभाचा समावेश असेल. शांतता, विविधता, सहानुभूती आणि समुदायाधारित कार्य यांवर रचनात्मक संवाद घडविणे हे यामागील प्रमुख उद्दिष्ट आहे. इच्छिणाऱ्यांनी संकेतस्थळावर नोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांनी यावेळी केले.

Marathi News Esakal
www.esakal.com