पुणे एक्स्पो १० ते १२ डिसेंबरदरम्यान
पुणे, ता. ८ ः औद्योगिक क्षेत्रात महत्त्वाचा ठरणारा ‘पुणे एक्स्पो’ १० ते १२ डिसेंबर दरम्यान चिंचवडमधील ऑटो क्लस्टर प्रदर्शन केंद्रात पार पडणार आहे. नवतंत्रज्ञानाचा अवलंब, निर्मितीक्षेत्राचा विस्तार आणि उद्योगातील विविध घटकांमधील परस्परसंबंध हा यंदाच्या प्रदर्शनाचा मुख्य हेतू राहणार आहे. मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रिकल्चरतर्फे (एमसीसीआयए) आयोजित केल्या जाणाऱ्या या प्रदर्शनाची ही १४वी आवृत्ती असेल.
तीन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात २०० हून अधिक कंपन्यांचा सहभाग असेल. यात इंजिनिअरिंग, मॅन्युफॅक्चरिंग, डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग, इलेक्ट्रिकल, पॉवर, ऑटोमेशन, आयटी आणि स्मार्ट सोल्यूशन्स, स्टार्टअप्स तसेच महिला संचलित उद्योग या संदर्भातील विशेष विभाग असतील. प्रदर्शनास विविध औद्योगिक श्रेणींतील उद्योजक, संबंधित कर्मचारी, स्टार्टअप्स, इंजिनिअरिंग-पॉलिटेक्निक महाविद्यालयांतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी भेट द्यावी, असे आवाहन ‘एमसीसीआय’ने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

