पर्यटन विकास महामंडळातर्फे तरुणांना रोजगाराची सुवर्णसंधी

पर्यटन विकास महामंडळातर्फे तरुणांना रोजगाराची सुवर्णसंधी
Published on

पुणे, ता. ७ ः तरुणांना कौशल्यविकास व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) यांच्यातर्फे ‘एमटीडीसी रिसॉर्ट्स डेस्टिनेशन टुरिस्ट गाइड’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाचा उद्देश ‘एमटीडीसी’च्या ठिकाणी पर्यटकांना अधिक चांगला अनुभव देणे व पर्यटन स्थळांचे संवर्धन, स्थानिक संस्कृती, परंपरा, पाककृती, कला, स्थानिक उत्पादने, सण आदींचा प्रचार करणे आहे.
या कार्यक्रमाअंतर्गत स्थानिक मार्गदर्शकांना (गाइड) विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. ज्याद्वारे ते महाराष्ट्रातील ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारस्याची सखोल माहिती पर्यटकांना देऊ शकतील. त्याचबरोबर मार्गदर्शकांना व्यावसायिकता, ग्राहक सेवा आणि संप्रेषण कौशल्यांमध्येही प्रशिक्षित केले जाईल. तसेच या उपक्रमांतर्गत मार्गदर्शकांना पर्यटन स्थळांवरील ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि स्थानिक माहितीच्या अनुषंगाने सखोल शिक्षण दिले जाईल. त्यांना स्थानिक भाषांबरोबरच इंग्रजी, हिंदी आणि अन्य भाषांमध्येही मार्गदर्शन करण्यासाठी सक्षम करण्यात येईल.
प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना ‘एमटीडीसी’कडून प्रमाणपत्र आणि ओळखपत्र दिले जाईल. इच्छुक उमेदवारांनी अर्जासह पासपोर्ट आकाराचा फोटो व आवश्यक कागदपत्रे बुधवारपूर्वी (ता. १५) ‘resortguide@maharashtratourism.gov.in’ या संकेतस्थळावर पाठविणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी ‘एमटीडीसी’च्या अधिकृत संकेतस्थळावर संपर्क साधावा.

जगभरातील पर्यटकांना आकर्षित करणारी राज्यात अनेक पर्यटन स्थळे आहेत. या मार्गदर्शक कार्यक्रमामुळे पर्यटकांना त्यांच्या प्रवासाचा आनंद घेण्यास मदत होईल आणि पर्यटन उद्योगात स्थानिक रोजगाराच्या संधी निर्माण होतील.
- मनोजकुमार सूर्यवंशी, व्यवस्थापकीय संचालक, पर्यटन विकास महामंडळ

आवश्यक पात्रतानिकष
१) वय : २१ ते ३५ वर्षे
२) किमान शैक्षणिक पात्रता : आठवी, एसएससी किंवा एचएससी उत्तीर्ण
३) उमेदवाराने इंग्रजी, मराठी, हिंदी किंवा कोणतीही परदेशी भाषेत लेखन आणि बोलणे आवश्यक आहे
४) उमेदवार स्थानिक रहिवासी असावा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com