डॉ. आढाव यांचे कार्य आदर्शव्रत
पुणे, ता. ११ : शहरातील विविध संस्था, संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांना श्रद्धांजली अर्पण केली. कष्टकरी, वंचित आणि उपेक्षित समाजासाठी बाबांनी आयुष्यभर केलेल्या कार्याचा आदर्श पुढील पिढीसाठी मार्गदर्शक असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
मातंग एकता आंदोलन संघटनेने भवानी पेठेत श्रद्धांजली सभेचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी दलित चळवळीतील ज्येष्ठ नेते अंकल सोनवणे होते, तसेच संघाचे संस्थापक रमेश बागवे, कामगार नेते नितीन पवार, हमाल पंचायत संघटनेचे अध्यक्ष गोरखनाथ मेंगडे, संजय दिवेकर, संजय मोरे, वीरेंद्र किराड, रतन किराड, भवानी पेठेतील स्वच्छ संस्थेचे कचरावेचक, महिला तसेच रिक्षा व टेम्पो चालक संघटनेचे पदाधिकारी, टिंबर मार्केटमधील हमाल पंचायतीचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी डॉ. आढाव यांच्या कार्याला उजाळा दिला.
डॉ. आढाव यांना झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या वतीने मार्केट यार्ड येथील हमाल भवनात संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भगवानराव वैराट यांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश कामगार सुरक्षा दलाचे काशिनाथ गायकवाड, गणेश लांडगे, सुरेखा भालेराव, वंदना पवार, गुलशन शेख, संतोष कदम उपस्थित होते.
महाराष्ट्र प्रदेश दलित सेनेचे प्रदेशाध्यक्ष सुनील यादव यांनी आढाव यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष वसंत बोले, काळुराम ससाणे, शशिकांत शेलार, प्रदीप गायकवाड, शशिकांत कांबळे, सविता कांबळे, वैशाली कांबळे, विद्या पंदिरकर, शैलेंद्र चव्हाण, मिलिंद कांबळे, राजू आगरकर उपस्थित होते.
संभाजी ब्रिगेड व मराठा सेवा संघाच्या वतीने आढाव यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी सौरभ खेडेकर, संतोष शिंदे, मनोज गायकवाड, सिद्धार्थ कोंढाळकर, महादेव मातेरे, रामा कसबे, गौरी कांबळे, प्रीतम कौढाळकर, सुजित मगर, अलफज गारदीहे उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

