महायुतीमधील तिन्ही पक्ष एकत्र राहण्याचा प्रयत्न : उपाध्ये
पुणे, ता. १० : ‘‘स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक म्हणून ओळखली जाते. त्यासाठी या निवडणुकीत महायुतीमधील तिन्ही पक्ष एकत्र राहण्याचा प्रयत्न करतील. भाजपसाठी वर्षानुवर्षे काम करणाऱ्या ८० टक्के कार्यकर्त्यांनाच निवडणुकीत संधी देऊन ही निवडणूक व्यावसायिक पद्धतीने लढण्यास प्राधान्य दिले जाईल,’’ असे भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
सरकार स्थापनेला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने राज्यात वाढलेली गुंतवणूक, झोपडपट्टी पुनर्वसन योजना, विद्युतदर कपात, विकासकामे, रोजगाराच्या संधी, शेतकऱ्यांसाठी योजना, कर्जमाफी, अतिवृष्टीतील आर्थिक मदत, विविध योजना व प्रकल्पांची माहिती उपाध्ये यांनी पक्ष कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
उपाध्ये म्हणाले, ‘‘पुणेकरांना चांगले, विकसित व सुरक्षित शहर देण्याचा आमचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या तिघांमध्ये चांगले समन्वय आहे. नगरपालिका निवडणुकीत एकत्र येऊ शकलो नाही. मात्र महापालिका निवडणुकीमध्ये महायुती म्हणूनच निवडणूक लढण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला जाईल.’’
केशव उपाध्ये म्हणाले...
- फडणवीस यापूर्वी मुख्यमंत्री असतानाच तपोवनात लावले वृक्ष
- सध्या तपोवनातील वृक्षतोडीबाबत फेक नरेटिव्ह निर्माण करण्याचा प्रयत्न
- उद्धव ठाकरे यांनी केलेल्या वृक्षतोडीची माहिती पुढे आणू
- मुंढवा जमीन खरेदीप्रकरणी चौकशी सुरू, अहवाल अद्याप आला नाही
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

