‘लिफ्ट फॉर अपलिफ्टमेंट’चा सोमवारी दशकपूर्ती सोहळा
पुणे, ता. १० ः वैद्यकीय शिक्षण घेण्याची इच्छा असलेल्या गरजू आणि वंचित विद्यार्थ्यांना डॉक्टर होण्यासाठी ‘नीट’चे मोफत मार्गदर्शन देणारी ‘लिफ्ट फॉर अपलिफ्टमेंट’ (एलएफयू) ही स्वयंसेवी संस्था यंदा दशकपूर्ती वर्ष साजरे करत आहे. या निमित्ताने रविवारी (ता. १४) मालधक्का चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृह येथे दशकपूर्ती सोहळ्याचे आयोजन केले आहे. विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संस्थेचा प्रवास, उपक्रम आणि यशाचा आढावा सादर केला जाणार आहे.
समारंभाला महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. माधुरी कानिटकर, ज्येष्ठ वैद्यकीयतज्ज्ञ डॉ. पद्माकर पंडित व पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील हे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित राहतील, तसेच विविध क्षेत्रांतील तज्ज्ञही उपस्थित राहणार आहेत. या वेळी संस्थेचा प्रवास, विद्यार्थी सत्कार, स्वयंसेवकांचा गौरव व आगामी दशकाची वाटचाल यावर प्रकाश टाकण्यात येईल. संस्थेच्या कार्यातून आजपर्यंत १२३ विद्यार्थी एमबीबीएस, १७ बीडीएस, ९६ बीएएमएस, २२ बीएचएमएस आणि ४९ नर्सिंग व इतर वैद्यकीय शाखांमध्ये प्रवेश मिळवण्यात यश मिळाले आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ. अतुल ढाकणे, उपाध्यक्ष डॉ. फारुख फरास व सचिव डॉ. मयांक त्रिपाठी यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

