व्होटचोरीद्वारे लोकशाही 
संपुष्टात आणण्याचा डाव
हर्षवर्धन सपकाळ यांची भाजपवर टीका

व्होटचोरीद्वारे लोकशाही संपुष्टात आणण्याचा डाव हर्षवर्धन सपकाळ यांची भाजपवर टीका

Published on

पुणे, ता. १० ः ‘‘व्होटचोरी हे देशातील विदारक सत्य असून, लोकशाही संपुष्टात आणण्याचा हा भाजपचा कुटिल डाव आहे. लोकांचा एकमताचा अधिकार हिरावून घेणे म्हणजे नागरिकांना दिलेल्या सर्वोच्च शक्तीचा अपमान आहे. भारतीय संविधानाने सर्व जाती-धर्म, महिला-पुरुष यांना समान मताधिकार दिला आहे. परंतु भाजप-आरएसएस या शक्तीला कमकुवत करून ठराविक लोकांसाठीच सत्ता टिकवण्याचा प्रयत्न करत आहेत. ‘व्होट चोरी’ हे त्यांच्या अनेक हत्यारांपैकी एक असून, लोकशाहीला पोकळ करण्याच्या षडयंत्राचा तो मोठा भाग आहे,’’ अशी टीका कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
कॉंग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘सेवा - कर्तव्य - त्याग’ सप्ताहात आयोजित ‘लोकशाहीची हत्या – व्होट चोरीचे विदारक सत्य’ या प्रदर्शनास बालगंधर्व कलादालन येथे हर्षवर्धन सपकाळ यांनी भेट दिली, तेव्हा ते बोलत होते. या प्रदर्शनाचे मार्गदर्शक प्रदेश कॉंग्रेस समितीचे वरिष्ठ उपाध्यक्ष व माजी आमदार मोहन जोशी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. ते म्हणाले, ‘‘व्होट चोरी हा केवळ निवडणूक विषय नाही; तो लोकशाहीच्या अस्तित्वाशी निगडित गंभीर प्रश्न आहे.’’
प्रदर्शनाचे आयोजक, युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रथमेश आबनावे यांनी व्होट चोरी हा लोकशाहीचा गळा घोटणारा सर्वात धोकादायक प्रयोग आहे, असे सांगितले. या प्रसंगी माजी नगरसेवक अविनाश बागवे, सुनील मलके, लता राजगुरू, काँग्रेस कमिटीचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत सुरसे, अॅड. शाबीर शेख, इंटक्सचे अध्यक्ष चेतन अग्रवाल, अनेक आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
--------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com