

पुणे, ता. ७ : रोजगार हमी योजनेत आता फळबाग लागवड, रोपवाटिका, फूलबाग, शेततळे आदी वैयक्तिक लाभाच्या कामांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात रोजगार हमी योजनेतील कामांची आणि मजुरांच्या संख्येत वाढ झाली आहे. जिल्ह्यातील ४३५ ग्रामपंचायतींमध्ये ८३९ कामे सुरू असून, त्यावर चार हजार मजूर काम करत आहेत.
जिल्ह्यात रोजगार हमी योजनेंतर्गत सध्या ग्रामपंचायत आणि इतर विविध शासकीय यंत्रणांमार्फत कामे सुरू आहेत. आता सार्वजनिक कामांबरोबरच शेतकऱ्यांना स्वत:च्या शेतात विहीर खोदणे, फळबाग लागवड आदी कामांसाठी निधी देण्यात येतो. त्यामुळे याच कामांवर काम करून त्यांना मोबदलासुद्धा मिळतो. त्यामुळे ‘रोहयो’वरील कामांना गती मिळाली आहे. सद्यःस्थितीत मजुरांना दररोज २९७ रुपये इतका रोजगार देण्यात येत आहे. ही रक्कम संबंधित मजुरांच्या बँक खात्यांवर जमा करण्यात येते.
‘रोहयो’अंतर्गत जिल्ह्यात सर्वाधिक कामे जुन्नर तालुक्यात सुरू असून या तालुक्यात १३२ कामांवर ५७४ मजूर काम करत आहेत. बारामती तालुक्यात ११२ कामांवर ५७५ मजूर, आंबेगाव तालुक्यात ९९ कामांवर ६०५ मजूर, भोरमध्ये ४४ कामांवर १८० मजूर, दौंडमध्ये ३९ कामांवर ३७८ मजूर, हवेली तालुक्यात ३६ कामांवर १३८ मजूर, मुळशी तालुक्यात ६ कामांवर अवघे १० मजूर काम करत आहेत. तर इंदापूर तालुक्यात ४० कामांवर २५३ मजूर, खेडमध्ये ९० कामांवर ३६२ मजूर, मावळमध्ये ४० कामांवर २१० मजूर, पुरंदरमध्ये ८२ कामांवर २३४ मजूर, शिरूरमध्ये ६१ कामांवर ३३४ मजूर तर वेल्हा तालुक्यात ५८ कामांवर १५१ मजूर काम करत आहेत, अशी माहिती जिल्हा उपजिल्हाधिकारी डॉ. चारुलता देशमुख-मोहिते यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.