पीएमपीची ‘उत्पन्न’ यात्रा
पुणे, ता. २५ : पीएमपी प्रशासनाने यंदा संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर १८ ते २३ जूनदरम्यान सुमारे ४०० अतिरिक्त बससेवेची व्यवस्था केली होती. यातून सुमारे पाच लाख प्रवाशांची वाहतूक झाली, तर १२ कोटी रुपयांहून अधिक उत्पन्न मिळाले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पीएमपीच्या उत्पन्नात सुमारे अडीच कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
पुण्यात पालख्या दाखल झाल्यानंतर शहरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. त्यावेळी अनेकजण सार्वजनिक वाहतुकीचा वापर करतात. काही रस्त्यांवर खासगी वाहनांना बंदी असते, अशा मार्गांवर बससेवा सुरू असते. शिवाय वारकऱ्यांकडे वाहन नसल्याने ते पुण्यात अथवा आजूबाजूचा परिसर पाहण्यासाठी पीएमपी बसचा वापर करतात. परिणामी पीएमपीच्या प्रवासी संख्येत वाढ होते. शहरातील वाहतूक कोंडीमुळे काही फेऱ्या रद्द होत असल्याने पीएमपी प्रशासनाने यंदा वडकी व सासवड येथून जादा बसेसची वाहतूक सुरू ठेवली होती. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला.
पीएमपीने काय केले...
१) पालखी मार्गावर वारकऱ्यांसाठी १८ ते २३ जूनपर्यंत विशेष बससेवा
२) दररोज सुमारे १७०० बस रस्त्यावर
३) सहा दिवसांत नऊ हजार ७०१ बसच्या माध्यमातून वाहतूक
४) सुमारे पाच लाख प्रवाशांना फायदा
५) १२ कोटी ४ लाख ४२ हजार ९२४ रुपये उत्पन्न मिळाले
६) गेल्या वर्षी वारीच्या काळात नऊ कोटी ५२ लाख रुपये उत्पन्न
भाविकांची सोय होण्यासाठी विशेष बसगाड्यांचे नियोजन केले होते. नेहमीच्या तुलनेत जास्तीच्या गाड्या प्रवाशांच्या सेवेसाठी सोडण्यात आल्या. त्यामुळे प्रवाशांची सोय झाली आणि पीएमपीचे उत्पन्नही वाढले.
- दीपा मुधोळ-मुंडे,
अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

