टोळक्याचा तरुणाला पेटविण्याचा प्रयत्न
पुणे, ता. २५ : किरकोळ वादातून टोळक्याने तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार केल्याची घटना कोंढवा भागात घडली. टोळक्याने तरुणाच्या अंगावर ज्वलनशील द्रवपदार्थ ओतून पेटवून देण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी चौघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहुल शितोळे (वय २३, रा. महादेवनगर, कात्रज) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पप्पू गोवेकर याच्यासह चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत शितोळे याने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शितोळे आणि गोवेकर यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला होता. कोंढवा परिसरातील एका गोदामाजवळ रविवारी रात्री दोनच्या सुमारास गोवेकर आणि साथीदारांनी शितोळेला गाठले. त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. त्याच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतला. टोळक्याने केलेल्या हल्ल्यात शितोळे गंभीर जखमी झाला. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत असून, पोलिस उपनिरीक्षक रवींद्र गावडे तपास करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

