अडीच लाख वारकऱ्यांना
मोफत आरोग्यसेवा

अडीच लाख वारकऱ्यांना मोफत आरोग्यसेवा

Published on

पुणे, ता. २५ : आषाढी वारीनिमित्त पुणे विभागातील आरोग्य विभागाने देहू, आळंदी, सासवड तसेच इतर ठिकाणांहून पंढरपूरकडे मार्गस्थ होणाऱ्या अडीच लाख वारकऱ्यांना आरोग्‍यसेवा दिली. ‘आरोग्याची वारी-पंढरीच्या दारी’ असे या उपक्रमाला नाव दिले आहे.

पुणे आरोग्‍य परिमंडळात सुमारे चार हजार ३७६ अधिकारी आणि कर्मचारी विविध ठिकाणी कार्यरत असून, त्यांनी दोन लाख ४८ हजार २३३ वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी करून औषधोपचार केले आहेत. एकूण २०३ तात्पुरत्या ‘आपला दवाखाना’ केंद्रांमार्फत आणि ३३१ रुग्णवाहिकांद्वारे (१०२ व १०८ सेवा) २४ तास आरोग्यसेवा दिली जात आहे. तसेच २९० दुचाकी रुग्णवाहिका (आरोग्यदूत) सज्ज आहेत. महिलांसाठी ३७ हिरकणी कक्ष, १५ महिला केंद्रे आणि प्रत्येक मुक्कामी पाच खाटांची व्यवस्था असलेले ४६ अतिदक्षता विभाग तयार केले आहेत. तीन हजार ५०० औषधी किटचे मोफत वाटप करण्यात येणार आहे.

आरोग्य विभागाची कामगिरी
- स्वच्छतेकडेही विशेष लक्ष
- १८६ पाण्याचे टँकर, धूर फवारणी, पाण्याचे नमुने चाचणी
- जैविक कचऱ्याची विल्हेवाट
- हॉटेल कामगारांची तपासणी
- चित्ररथ, फलक आणि डिजिटल माध्यमाद्वारे जनजागृती
- वारकऱ्यांना तातडीची रुग्णवाहिका सेवा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com