नुकसान टाळण्यासाठी 
शेतकऱ्यांना प्रशिक्षण

नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण

Published on

पुणे, ता. २५ : बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत शेतमाल बाजारातील जोखीम कमी करण्यासाठी सुरू केलेल्या हेजिंग डेस्कच्या माध्यमातून राज्यात ५० विविध प्रशिक्षणांचे आयोजन करण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनांच्या भविष्यातील किमतीतील चढ-उतारामुळे होणारे नुकसान टाळता यावे, हे हेजिंग डेस्क या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे. पहिल्या टप्प्यात शुक्रवारी (ता. २७) पुण्यात कापूस, हळद आणि मका या पिकांसाठी हेजिंगविषयी एकदिवसीय प्रशिक्षण होणार आहे.
कृषी आयुक्त सूरज मांढरे, स्मार्टचे प्रकल्प संचालक डॉ. हेमंत वसेकर आणि कृषी संचालक अशोक किरनळ्ळी यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रशिक्षणास सुरुवात होणार आहे. साखर संकुलात महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाच्या हॉलमध्ये प्रशिक्षण होणार आहे. यामध्ये वायदेबाजारतज्ज्ञ श्रीकांत कुवळेकर आणि ‘एनसीडीईएक्स’चे उपाध्यक्ष नीरज शुक्ला मार्गदर्शन करणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com