स्वसंरक्षण की ‘स्टेटस सिम्बॉल’?

स्वसंरक्षण की ‘स्टेटस सिम्बॉल’?

Published on

पुणे, ता. २९ : शहरात गुन्हेगारी वाढल्यामुळे अनेकांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी, तर काहींनी ‘स्टेटस सिम्बॉल’साठी पिस्तूल परवाना मिळविण्याचा आग्रह धरला. मात्र, पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर मागील साधारण दीड वर्षात या अर्जांवर फेरविचार करत कठोर धोरण अवलंबिले आहे. परिणामी १४० पिस्तूल परवाने रद्द करण्यात आले असून, चारशेहून अधिक अर्ज पोलिसांनी नाकारले आहेत. त्यामुळे आता पिस्तूल परवाना मिळविण्यासाठी पोलिसांकडे येणाऱ्या अर्जांमध्येही घट झाली आहे.
पुणे शहरात आयटी कंपन्यांची वाढ, उद्योगधंद्यांची भरभराट, जागा बळकावणे, गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये स्वसंरक्षणाची गरज भासू लागली. त्यामुळे अनेकांनी पिस्तूल परवाना मिळविण्यासाठी अर्ज केले. मात्र, पोलिसांनी आता अशा प्रकारांवर आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर जानेवारी २०२४ पासून जून २०२५ अखेर आलेल्या अर्जांवर तातडीने कारवाई करत ५७२ अर्जांपैकी केवळ २८ अर्जांना परवानगी दिली आहे. त्यातील १० अर्ज वारसा हक्कातून, तर ९ अर्ज स्पोर्ट्‌स श्रेणीतून मंजूर करण्यात आले आहेत.

अनेक अर्जदारांनी ‘स्वसंरक्षणासाठी परवाना हवा’, असे कारण दिले असले, तरी पोलिसांनी किरकोळ कारणावर पिस्तूल परवाना मंजूर करण्यास परवानगी नाकारली आहे, तसेच परवानाधारकांच्या पार्श्वभूमीची सखोल तपासणी करून परवाना कायम ठेवायचा की रद्द करायचा, याबाबत निर्णय घेतला जात आहे.
------------------
मागील काही वर्षांत काही जणांनी शस्त्र परवाना चुकीच्या पद्धतीने मिळविल्याचे समोर आले. पोलिसांनी त्यांची पुनर्तपासणी केली. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना आणि ‘स्टेटस सिम्बॉल’साठी परवाना दिला जाणार नाही. केवळ वारसा हक्कातून आणि स्पोर्ट्‌स‌ श्रेणीतून शस्त्र परवाना देण्यात आला आहे. आता शस्त्र परवाना मिळणार नसल्याची खात्री पटल्याने अशा अर्जदारांची संख्याही घटली आहे.
- अमितेश कुमार, पोलिस आयुक्त, पुणे शहर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com