मुलाचा खून करणाऱ्या 
वडिलांना जन्मठेपेची शिक्षा

मुलाचा खून करणाऱ्या वडिलांना जन्मठेपेची शिक्षा

Published on

पुणे, ता. १ : कौटुंबिक वादातून कुऱ्हाड डोक्यात घालून मुलाचा खून करणाऱ्या वडिलांना न्यायालयाने जन्मठेप आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. आय. पेरमपल्ली यांनी हा निकाल दिला.
दशरथ चिमाजी जमदाडे (वय ६५, रा. माळवाडी वीर, ता. पुरंदर) असे जन्मठेप झालेल्या वडिलांचे नाव आहे. गणेश (वय ३२) याचा खून झाला होता. या प्रकरणी गणेशचा चुलत भाऊ योगेश जमदाडे याने सासवड पोलिसात फिर्याद दिली होती. सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील प्रदीप गेहलोत यांनी या खटल्याचे काम पाहिले. त्यांना जिल्हा न्यायालय पैरवी अधिकारी पोलिस निरीक्षक संतोष घोळवे, सत्र न्यायालय पैरवी अंमलदार पोलिस उपनिरीक्षक विद्याधर निचित, न्यायालय पैरवी अंमलदार सहायक पोलिस उपनिरीक्षक जयसिंग जाधव यांनी कामकाजासाठी मदत केली.
१५ जानेवारी २०१९ ला गणेशचा घरात खून झाला होता. दशरथ याने मुलाच्या डोक्यात, डाव्या कानावर कुऱ्हाडीने वार करून त्याचा खून केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी सासवड पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com