पुणे पालिकेच्या अभियंता भरतीसाठी जागा वाढल्या
पुणे, ता. १ : गेल्या दीड वर्षांपासून रखडलेली महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता पदांची भरतीप्रक्रिया अखेर मार्गी लागण्याची शक्यता आहे. राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने या भरतीसाठी ११३ ऐवजी १७१ जागांना मंजुरी दिली आहे. त्यासाठी जानेवारी २०२४ मध्ये अर्ज केलेल्या २७ हजार ८७९ उमेदवारांचे अर्जही वैध धरले जाणार आहेत.
पुणे महापालिकेने जानेवारी २०२४ मध्ये कनिष्ठ अभियंता पदांच्या ११३ जागांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध केली होती. मात्र, त्यावेळी सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीय उमेदवारांसाठी आरक्षणाची तरतूद न केल्यामुळे शासनाने ही प्रक्रिया थांबवून बिंदू नियमावली अद्ययावत करण्याचे निर्देश दिले होते. महापालिकेने त्यानुसार सुधारित नियमावलीनुसार नव्याने आरक्षण समाविष्ट करून जाहिरात प्रसिद्ध करण्याची तयारी केली. मात्र, या प्रक्रियेत दीड वर्षाचा विलंब झाला आणि अर्ज केलेल्या हजारो उमेदवारांचे भवितव्य अधांतरी राहिले होते. या पार्श्वभूमीवर महापालिकेने नगरविकास विभागाकडे मार्गदर्शन मागितले होते. त्यावर विभागाने नव्याने १७१ पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करावी आणि आधी अर्ज केलेल्या उमेदवारांचे अर्ज कायम ठेवावेत, असा स्पष्ट अभिप्राय दिला आहे.
वयोमर्यादेचा धोका नाही
नगरविकास विभागाच्या आदेशानुसार, जानेवारी २०२४ मध्ये अर्ज केलेल्या उमेदवारांना त्यांच्या जातीचा प्रवर्ग सुधारणेची संधी दिली जाणार आहे. तसेच, दीड वर्षाच्या कालावधीत वयोमर्यादा पार केलेल्या उमेदवारांनाही नव्या जाहिरातीत अर्ज करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे जुने अर्जदार देखील या भरती प्रक्रियेत सहभागी होऊ शकणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.